भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षांच्या निवडणूकीत काँग्रेसचा पराभव पक्का होता. तरीही काँग्रेसने आपला उमेदवार मैदानात का उतरवला? यामागे राहुल गांधींची कोणती रणनीती होती, यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचा पराभव पक्का होता. तरीही लोकसभेनंतर आत्मविश्वास वाढलेल्या इंडिया आघाडीने काँग्रेसच्या के सुरेश यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं.
एनडीएकडे 293 खासदारांचं संख्याबळ आहे तर इंडिया आघाडीकडे 233 खासदारांचं संख्याबळ आहे. तर 16 अपक्ष खासदार आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीला जिंकण्यासाठी 39 खासदारांची आवश्यकता होती. मात्र तरीही काँग्रेसनं एनडीएविरोधात शड्डू ठोकले. त्यामुळे पराभव पक्का असतानाही काँग्रेस का लढली? याची चर्चा रंगलीय.
1) लोकसभा अध्यक्षपद सरकारकडे तर उपाध्यक्षपद विरोधीपक्षाला देण्याची परंपरा आहे. त्यामुळे सरकार परंपरा आणि शिष्टाचार पाळत नसल्याचा संदेश देण्याची संधी
2) विरोधकांची एकजूट दाखवण्यासाठी काँग्रेसनं अध्यक्षपदाची निवडणूक लढवली.
3) के सुरेश हे दलित असल्यामुळे भाजप दलितविरोधी असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न
4) चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यासह एनडीएमध्ये असलेली नाराजी असल्यास क्रॉस मतदानातून चाचपणी
लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओम बिर्ला हे विजयी झाले. मात्र 2014 आणि 2019 मध्ये कमकुवत झालेला विरोधी पक्ष लढू शकतो हे या इंडियाने दाखवून दिलंय. मात्र काँग्रेसने आखलेली रणनिती आणि बांधलेले आडाखे यशस्वी होतात का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.