Maharashtra Lok Sabha Election News :
Maharashtra Lok Sabha Election News :  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Election : महाराष्ट्रात पुढील २-३ दिवसांत 'राजकीय धुळवड'; मोठ्या घडामोडींची शक्यता

Vishal Gangurde

Maharashtra lok Sabha Election News :

देशासहित राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्व राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. सध्या राजकीय पक्षांनी जागावाटपांसाठी बैठकांचा धडाका लावला आहे. मात्र, राज्यातील युती, आघाडीचा जागावाटपाचा तिढा कायम असून येत्या २-३ दिवसांत हा तिढा मिटण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील २-३ दिवसांत 'राजकीय धुळवड' पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांच्या चार याद्या जाहीर केल्या आहेत. तर भाजपने राज्यातील २० उमेदवार जाहीर केले आहेत. दुसरीकडे काँग्रेसने आतापर्यंत उमेदवारांच्या ३ याद्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेसने राज्यातील ७ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे इतर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस, भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळते, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी बैठका सुरु आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होईल का, हे देखील येत्या २-३ दिवसांत स्पष्ट होईल.

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय?

महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाला २२, काँग्रेसला १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाला १० जागा सुटण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा ४ जागांवरून अडल्याचे सांगितलं जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महाविकास आघाडीचा तिढा मिटण्याची शक्यता आहे.

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय?

महायुतीच्या जागावाटपाचाही तिढा कायम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप , शिंदे गट आणि अजित पवार गट अनुक्रमे ३१-१३-४ असा महायुतीचा फॉर्म्युला असण्याची शक्यता आहे. तर काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे लवकरच महायुतीमध्ये मनसे देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. या महायुतीच्या जागावाटपात मनसेला किती जागा मिळतील, हे देखील पहावे लागेल.

महायुतीच्या जागावाटपावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

महायुतीच्या प्रमुख नेत्यांची जागावाटपासाठी दिल्लीत महत्वाची बैठक आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला पोहोचले आहेत. या बैठकीसाठी दिल्लीला पोहोचलेल्या देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महायुतीच्या जागावाटपावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आमचं ८० टक्के काम पूर्ण झालं आहे. २० टक्के काम लवकरच पूर्ण करू. बैठकीमध्ये याचा निर्णय होईल. तीन पक्षांचं अंतिम जागावाटप बाकी आहे. येत्या दोन दिवसांत जागावाटप होईल.'

जागावाटपावर श्रीकांत शिंदे काय म्हणाले?

महायुतीच्या जागावाटपाविषयी खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, 'महायुतीची जागा वाटप लवकरच होईल आणि उमेदवार देखील लवकरात लवकर जाहीर होईल'.

महाविकास आघाडीच्या जागावाटपावर नाना पटोले काय म्हणाले?

नाना पटोले म्हणाले, 'महाविकास आघाडीची जागावाटपावर चर्चा झाली आहे. वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष, माकप या पक्षांशी बोलणी सुरु आहे. काँग्रेसचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. सर्व मित्र पक्षांशी चर्चा करून महाविकास आघाडीचे जागावाटप आणि उमेदवार दोन-तीन दिवसांत जाहीर होतील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election Voting | बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनी बजावला मतादानाचा हक्क!

Shiv Sena UBT vs BJP: मतदान केंद्रावरच ठाकरे गट आणि भाजप एकमेकांना भिडले!

Maharashtra Lok Sabha Voting Live: नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात तृतीयपंथींनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Politics: मुंबई, नाशिकमध्ये मविआ आणि भाजप कार्यकर्त्यांचा राडा; काँग्रेस कार्यकर्त्याने धमकावलं, BJP चा आरोप

HSC Result Update | या वेबसाईटवर 12 वी निकाल पहायला मिळेल!

SCROLL FOR NEXT