Maharashtra Lok Sabha: 80 टक्के काम पूर्ण, दोन दिवसात जागावाटप जाहीर होणार: देवेंद्र फडणवीस

Lok Sabha Election 2024: ''जागावाटपाचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. 20 टक्के काम अद्यापही बाकी आहे. त्याबाबत आज किंवा उद्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ. तसेच तीन पक्षांमधील जे जागावाटप आहे, ते आम्ही पूर्ण करू'', असं फडणवीस म्हणाले आहेत.
Devendra Fadnavis On Maharashtra Lok Sabha Election 2024
Devendra Fadnavis On Maharashtra Lok Sabha Election 2024Saam Tv

Devendra Fadnavis On Maharashtra Lok Sabha Election 2024:

''जागावाटपाचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. 20 टक्के काम अद्यापही बाकी आहे. त्याबाबत आज किंवा उद्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ. तसेच तीन पक्षांमधील जे जागावाटप आहे, ते आम्ही पूर्ण करू'', असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

ते म्हणाले आहेत की, ''भाजपच्या वाटेल ज्या जागा आल्या आहेत आणि ज्या अपेक्षित आहे, याबाबतची मांडणी आम्ही याआधीही भाजप केंद्रीय निवडणूक समितीसमोर (CEC) केली आहे. त्यामुळे ज्या सुटलेल्या जागा आहेत, त्यासंदर्भात सीईसी निर्णय घेईल. तसेच ज्या जागा सुटू शकतात, त्यासंदर्भात पुढील सीईसी किंवा अध्यक्षांना अधिकार दिला तर त्यांच्या संमतीने जागावाटप जाहीर होईल.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Devendra Fadnavis On Maharashtra Lok Sabha Election 2024
Kolhapur Loksabha: मोठी बातमी! 'वंचित आघाडी'चा शाहू महाराज छत्रपतींना पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

ते म्हणाले की, आमच्या खूप जास्त जागा घोषित होणं बाकी नाही आहे. तीन पक्षांमध्ये अंतिम जागावाटपाचा मुद्दा आमच्यासमोर सध्या शल्लक आहे.'' महाविकास आघाडीने कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर केली आहे. अनेकांचं म्हणणं आहे, तिथे त्यांचा सन्मान राखला जावा. भाजप तिथे ही जागा बिनविरोध करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता, ते म्हणाले, ''उद्या साताऱ्यात महायुतीने उदयनराजे भोसले यांना उमेदवसरी दिली. तर ते बिनविरोध करणार आहेत का? त्यांचाही सन्मान आहे. सगळ्यांचा सन्मान आहे, मात्र हे राजकारण आहे.''  (Latest Marathi News)

उदयनराजे दिल्लीत आहेत. त्यांची अद्याप अमित शाह यांच्याशी भेट झाली नाही? याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''उदयनराजे आणि अमित शाह यांची आज भेट होईल. ते त्यांचं मत मांडतील.''

Devendra Fadnavis On Maharashtra Lok Sabha Election 2024
Delhi CM Arvind Kejriwal : मोठी बातमी! दिल्लीतील आपचं मुख्यालय केलं 'सील'; 'लेव्हल प्लेइंग फील्ड'चं उल्लंघन असल्याचा मंत्री आतिशी यांचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज रात्री 8 वाजता दिल्लीला जाणार आहे, अशी चर्चा आहे. याबाबत फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले, ''याबाबत अद्याप ठरलेलं नाही, कारण आज आमची सीईसी आहे. सीईसी किती वाजता संपले, यावर ते ठरेल. आज सीईसी लवकर संपली तर त्यांना बोलवलं जाऊ शकतं, किंवा उद्या बोलवलं जाईल.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com