Prakash Ambedkar News: महाविकास आघाडीसोबत जमलं तरचं उद्धव ठाकरेंशी युती.. प्रकाश आंबेडकरांचे मोठं वक्तव्य

Maharashtra Loksabha Election 2024: वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत असलेल्या आघाडीबाबत सर्वात मोठे विधान केले आहे.
Vanchit Bahujan Aghadi, Mahavikas Aghadi, Prakash Ambedkar, Uddhav Thackeray, maharashtra Politics
Vanchit Bahujan Aghadi, Mahavikas Aghadi, Prakash Ambedkar, Uddhav Thackeray, maharashtra PoliticsSocial Media

सूरज मासुरकर, मुंबई|ता. २३ मार्च २०२४

Prakash Ambedkar News:

एकीकडे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या युतीचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. याबाबत २६ मार्चपर्यंत वाट पाहणार अन्यथा भूमिका जाहीर करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यासोबतच वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत असलेल्या आघाडीबाबत सर्वात मोठे विधान केले आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

"उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आमची आघाडी आता राहिली नाही. कारण आता चार पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि वंचितमध्ये जे होतं ते आता राहिलेले नाही. मी अनेकदा त्यांना बोललो की महाविकास आघाडीमध्ये वंचितला जायचं असेल तर आधी आपण दोघांनी चर्चा केली पाहिजे, मात्र त्या गोष्टी झाल्या नाहीत. त्यामुळे आता महाविकास आघाडी सोबत जमले तर युती आहे नाही जमले तर युती नाही," अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

"महाविकास आघाडीचाच (Mahavikas Aaghadi) जागा वाटपाचा तिढा मिटणार नसेल तर आमची इंट्री करून काय उपयोग. आम्ही 26 तारखेपर्यंत थांबणार आहे. आम्ही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र दिले आहे. आम्ही पाठिंबा देणाऱ्या सात जागांवर काँग्रेसचे एकमत झाले तर बरं आहे, असे म्हणत 26 तारखेला आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार," असल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vanchit Bahujan Aghadi, Mahavikas Aghadi, Prakash Ambedkar, Uddhav Thackeray, maharashtra Politics
Washim Accident News : सावंगी फाटानजीक कार ऑटोचा अपघात, चार प्रवासी जखमी

कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा!

 "शाहू महाराजांचे विचार आणि त्यांचे कुटुंब हे चळवळीचे जवळचे कुटुंब आम्ही मानतो. म्हणून पक्षाच्या वतीने त्यांना आमचा पुर्णपणे पाठिंबा आहे. छत्रपती शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी जे प्रयत्न करायला लागतील. ते पक्षाच्या वतीने आम्ही करु," असे म्हणत वंचित आघाडीचा शाहू महाराजांना पाठिंबा असल्याचेही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जाहीर केले आहे. (Latest Marathi News)

Vanchit Bahujan Aghadi, Mahavikas Aghadi, Prakash Ambedkar, Uddhav Thackeray, maharashtra Politics
Political News : "इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य म्हणत, उद्धव ठाकरेंचं राज्य येवो"; ठाकरे गट युवा सेनेच्या वतीने निषेध होळी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com