Political News : "इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य म्हणत, उद्धव ठाकरेंचं राज्य येवो"; ठाकरे गट युवा सेनेच्या वतीने निषेध होळी

Holi News : क्षफोडी, महिला अत्याचार, गोळीबार, बेरोजगारी, महागाई त्याचबरोबर शेतकरी आत्महत्या यांसारख्या विविध प्रश्नांचे फलक जाळून भाजप सरकारचा निषेध करत निषेध होळी साजरी केली आहे.
Political News
Political NewsSaam TV

Uddhav Thackeray :

इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य म्हणजेच उद्धव ठाकरेंचं राज्य येवो, असे म्हणत युवा सेनेच्या वतीने भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. निषेध व्यक्त करत कार्यकर्त्यांनी धुळे महानगरपालिकेच्या जुन्या महानगरपालिका इमारतीसमोर निषेध होळी साजरी केली आहे.

Political News
Nandurbar Crime: झटपट श्रीमंत होण्याचं आमिष दाखवित ऑनलाइन कंपन्यांनी लावला चुना; 10 हजारांहून अधिक तरुणांची फसवणूक

यावेळी गेल्या पाच वर्षात भाजप तर्फे ईडी सीबीआय या तपास यंत्रणांचा गैरवापर केला असल्याचे सांगण्यात आले. तसेच युवसेनेच्या वतीने मणिपूर अत्याचार तसेच पक्षफोडी, महिला अत्याचार, गोळीबार, बेरोजगारी, महागाई त्याचबरोबर शेतकरी आत्महत्या यांसारख्या विविध प्रश्नांचे फलक जाळून भाजप सरकारचा निषेध करत निषेध होळी साजरी केली आहे.

यावेळी भाजपच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली. ही निषेध होळी साजरी करण्यासाठी युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी रस्त्यावर अन्य नागरिक देखील एकवटले होते.

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जागावाटपासह कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार असणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. अद्यापही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या फायनल जागा ठरलेल्या नाहीत. मात्र तरी देखील अनेक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात दावे आणि आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत सत्तेत सहभाग घेतला. त्यावेळी शिंदेंच्या या निर्णयाने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्याचे म्हणत आजवर शिंदे आणि ठाकरे गटात बऱ्याचदा मोठी खडाजंगी झाली आहे. त्यामुळेच होळी निमित्त देखील ठाकरे गट युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने होळी केली आहे.

Political News
Buldhana Crime News : संतापजनक! अंगणवाडी सेविकेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून मारहाण; ३ आरोपींवर गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com