Nandurbar Crime: झटपट श्रीमंत होण्याचं आमिष दाखवित ऑनलाइन कंपन्यांनी लावला चुना; 10 हजारांहून अधिक तरुणांची फसवणूक

Youth Cheated By Online Companies: नंदुरबारमध्ये झटपट श्रीमंत होण्याचं आमिष दाखवित ऑनलाइन कंपन्यांनी फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. नंदुरबारमध्ये 10 हजारांहून अधिक तरुणांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.
Nandurbar Crime News
Nandurbar Crime NewsYandex
Published On

सागर निकवाडे

Youth Cheated By Online Companies In Nandurbar

नंदुरबारमध्ये झटपट श्रीमंत होण्याचं आमिष दाखवित ऑनलाइन कंपन्यांनी फसवणूक झाल्याचं समोर आलं (Nandurbar Crime News) आहे. नंदुरबारमध्ये 10 हजारांहून अधिक तरुणांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. नागरिकांची ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार संपूर्ण जिल्ह्यातून समोर येत आहे.  (Latest Crime News)

गुंतवलेली रकमेच्या दुप्पट रक्कम तुम्हाला वीस दिवसात प्राप्त होईल, असं आमिष संबंधित कंपनीने दाखवले. यामुळे अनेक नागरिकांनी यामध्ये आपले पैसे गुंतवले. त्यानंतर या गुंतवणूकदारांचं आर्थिक नुकसान करून घेतल्याचं समोर आला (Youth Cheated By Online Companies) आहे. जिल्ह्यामध्ये या घटनेची उघड उघड चर्चा होत आहे, परंतु तक्रारीसाठी मात्र कोणीही पुढे येत नसल्याचं चित्र आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नक्की काय आहे प्रकरण?

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबई, पुणे आणि गुजरात राज्यातून टेलीग्राम चॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्निंग ॲपची जाहिरात व्हाट्सअप या सोशल मीडियावर आली (Nandurbar Crime) होती. काही ग्रुपवर यांसंबंधी पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर अनेक नागरिकांनी प्लेस्टोरवरून हे ॲप डाऊनलोड केले. त्यात नोंदणी केल्यानंतर किमान सहाशे पन्नास रूपये भरून सदस्यत्व घेण्यात येत होते.

सदस्यत्व घेतल्यानंतर संबंधित प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर किमतीपेक्षा कितीतरी अधिक किमतीत त्याची ऑनलाईन विक्री केली जात होती. दररोज गुंतवलेल्या रकमेपेक्षा दहा टक्के रक्कम वीस दिवसात आपल्या बँक खात्यावर जमा केली (Online Companies Fraud) जाईल. त्यासाठी आपण फक्त दररोज सकाळी आठ वाजता ॲपवर रक्कम जमा झाल्यावर ओके करा, अशा पद्धतीची ही जाहिरात होती.

Nandurbar Crime News
Buldhana Crime News : संतापजनक! अंगणवाडी सेविकेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून मारहाण; ३ आरोपींवर गुन्हा दाखल

झटपट श्रीमंत होण्याचं आमिष

या जाहिरातीने अनेकांना गंडवल्याचं चित्र नंदुरबार जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत. मात्र, याप्रकरणात तक्रार करण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात आहे. झटपट श्रीमंत होण्याचं आमिष दाखवित ऑनलाइन कंपन्यांनी हजारो तरूणांना चुना लावला आहे. अनेकदा आपण पैसे कमविण्यासाठी शॉर्टकट शोधत असतो, त्याच नादात आपले मोठे नुकसान देखील होते, असंच आता नंदूरबारमधून समोर आलंय.

दिवसेंदिवस अशा घटनांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं (Crime News) जात आहे. नंदुरबारमध्ये मोठ्या प्रमाणावर तरूणांनी फसवणूक झाली आहे. सायबर गुन्हेगारीचा आलेख देखील अलीकडे वर चढत आहे.

Nandurbar Crime News
Badlapur Crime : जावयाला बेदम मारहाण, प्लास्टिकच्या पिशवीत भरून नदीत फेकलं; धक्कादायक घटनेनं बदलापूर हादरलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com