राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वेध
फेब्रुवारीत निवडणुका होण्याची शक्यता
अजित पवार यांचं निवडणुकांबाबत मोठं विधान
दिलीप कांबळे, साम प्रतिनिधी
महापालिकांच्या निवडणुका होत नाही तोच राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वेध लागलेत. राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महायुतीमधील पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडत उमेदवारांसाठी प्रचार सुरू केलाय. हाती आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होतील, असं सांगण्यात येत आहे. त्याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत मोठं विधान केलंय.
पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत भाष्य केलं. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. पुणे ,पिंपरी चिंचवडमध्ये निवडणूक आहे. तुमचे मित्र,नातेवाईक तुम्ही कुणाचा निरोप न घेता तिथं प्रचाराला जावं असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलाय.
जिल्ह्यातील अनेक आमदार आपण घड्याळवर निवडून आणले मात्र मावळमध्ये घड्याळ येत नव्हतं,मात्र माघे सुनील शेळकेंना निवडून दिली,मावळला कोट्यवधीचा निधी दिला. जागतिक दर्जाची सायकल स्पर्ध घेणार आहोत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावण्याचा प्रयत्न आहे. या स्पर्धेसाठी चांगल्या दर्जाचे रस्ते काम सुरू आहे. लोक म्हणत आहेत, चांगल्या पद्धतीने रस्त्याचे काम सुरू आहे. याआधी बघितलं नव्हते, अशा कौतुकाची थाप जनेतेकडून मिळत असल्याचं अजित पवार म्हणाले.
पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर मिसिंग लिंक लवकर सुरू होईल, त्यामुळे आता गर्दी होणार नाही,त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल.टायगर पॉइंटर वर स्कायवॉक बसवणार आहे,स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न असणार आहे. शिव,शाहू,फुले यांच्या विचाराने आपण पुढे जात असतो,मात्र लोकांना पण दिसलं पाहिजे आपण त्या मार्गाने जात आहे. इंदूर शहर जस स्वचतेत पहिला नंबर येतो तसा आपल्या हित अस झालं पाहिजे ,त्यासाठी आपण बारामती, शिरूर मधलं चाकण,मावळ मधील लोणावळा ही शहर निवडली आहेत . असं अजित पवार यावेळी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.