70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा पुन्हा चर्चेत;अपने गिरेबान में झाँक के देखिए”… अजित पवारांवर रवींद्र चव्हाणांचा हल्लाबोल

Ajit Pawar vs BJP: अपने गिरेबान में झाँक के देखो... असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय.. मात्र महायुतीतील अजित पवार आणि रवींद्र चव्हाण एकत्र सत्तेत असतानाही आमने-सामने का आलेत..
Ajit Pawar irrigation scam controversy explained
Ajit Pawar irrigation scam controversy explainedSaam Tv
Published On

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आता रंगत आलीय... आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झालीय.. त्यात एण्ट्री झालीय ती 2014 मध्ये अजित पवारांवर भाजपनं केलेल्या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याची... अजित पवारांनी स्वतःच सिंचन घोटाळ्याचे आरोप करणाऱ्यांसोबत आपण सत्तेत असल्याचं वक्तव्य करत भाजपची गोची केलीय... तर भाजपनंही अजित पवारांनी आरोप करताना काळजी घ्यावी, असं म्हणत सूचक इशारा दिलाय..

अजित पवारांच्या वक्तव्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय.. अजित पवारांचं वक्तव्य सूचक असून त्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचे थेट संकेत दिल्याचं राऊतांनी म्हटलंय... अजित पवार आणि रवींद्र चव्हाण यांच्यातील आरोप प्रत्यारोप फक्त पत्रकार परिषदेपुरतेच मर्यादित राहिले नाहीत.... तर रवींद्र चव्हाणांनी थेट अजित पवारांना सोबत घेण्यावेळीच देवेंद्र फडणवीसांना विचार करण्याचा सल्ला दिला होता असं म्हटलंय..

आता पिंपरी चिंचवडनंतर अजित पवारांनी पुण्यातूनही भाजपची पोलखोल केलीय..त्यावर भाजप नेत्यांनी संयमी भूमिका घेतली आहे..... आता अजित पवार पुन्हा पुण्यातून भाजपवर तोफ डागत आहेत... त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विरुद्ध अजित पवार हा संघर्ष आणखी टोकदार होण्याची शक्यता आहे... मात्र या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी खरंच एकमेकांवर केलेले आरोप ठरणार की विरोधकांची मीडिया स्पेस स्वतःकडे खेचण्याची नुरा कुस्ती... याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com