विरोधक राहिले बाजूला! भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेत पेटली वादाची ठिणगी

Mahayuti Internal Conflict In Pune Municipal Elections: पुणे महापालिका निवडणुकीत महायुतीतील भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गुंड प्रवृत्तीच्या उमेदवारीवरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे.
Leaders of BJP, NCP (Ajit Pawar faction) and Shiv Sena during campaign activities ahead of the Pune Municipal Corporation elections, as internal rifts within the Mahayuti come to the forefront.
Leaders of BJP, NCP (Ajit Pawar faction) and Shiv Sena during campaign activities ahead of the Pune Municipal Corporation elections, as internal rifts within the Mahayuti come to the forefront.Saam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे महापालिका निवडणुकीसाठी महायुती मध्ये असणारे भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातच आता आरोप प्रत्यारोपांच्या ठिणग्या पेटल्या आहेत. पुणे महापालिकेसाठी भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस - शिवसेना उबाठा - मनसे असे पक्ष एकमेकांसमोर येत आहेत. आधी महायुती विरुद्ध महा विकास आघाडी असल्यामुळे यातील पक्षाचे नेते एकमेकांवर सडकून टीका करत होते. आता चित्र काहीसं बदलले आहे.

Leaders of BJP, NCP (Ajit Pawar faction) and Shiv Sena during campaign activities ahead of the Pune Municipal Corporation elections, as internal rifts within the Mahayuti come to the forefront.
Railway Expansion: राज्यातील ४८ रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार! पुणे, नाशिक, कोल्हापूर, बीडकरांना होणार फायदा; रेल्वे मंत्र्यांची घोषणा

महायुतीमधील तीन पक्ष हे वेगवेगळे लढत असल्यामुळे तिन्ही पक्ष एकमेकांवर टीका करत आहेत. या टीकेच्या मालिकेला सुरुवात झाली ती म्हणजे पुण्यातील गुंडांना आणि गुंड प्रवृत्तीच्या उमेदवारांना दिलेल्या उमेदवारीवरून.

Leaders of BJP, NCP (Ajit Pawar faction) and Shiv Sena during campaign activities ahead of the Pune Municipal Corporation elections, as internal rifts within the Mahayuti come to the forefront.
आम्ही बोललो तर तुमची अडचण होईल, Ravindra Chavan यांचा Ajit Pawar यांना इशारा

गुंडांना उमेदवारी दिल्यामुळे अजित पवारांवर टीका

गुंड आणि गुंडगिरीच्या प्रवृत्ती असलेल्यांना राष्ट्रवादी काँग्रेस ने उमेदवारी दिली आणि टीकेची झोड थेट अजित पवारांवर उठली. यामध्ये कुख्यात गुंड बंडू आंदेकर ची भावजय, लक्ष्मी आंदेकर, बंडू ची सून सोनाली आंदेकर, गुंड गजानन मारणे ची पत्नी जयश्री मारणे आणि गुंड बापू नायर यांना उमेदवारी दिल्यामुळे अजित पवारांवर अनेक स्तरातून टीका होताना दिसतेय. गुंडाना उमेदवारी दिल्यामुळे केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस चे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली.

Leaders of BJP, NCP (Ajit Pawar faction) and Shiv Sena during campaign activities ahead of the Pune Municipal Corporation elections, as internal rifts within the Mahayuti come to the forefront.
Municipal Election Results : मतदानाआधीच ६९ उमेदवार जिंकले; ४४ जागांवर कमळ फुलले, वाचा कुणाचे किती अन् कुठे उमेदवार बिनविरोध?

पालकमंत्री बोलतात की कोयता गँग, गुन्हेगारी संपली पाहिजे मात्र पूर्वपासून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जर पाहिली तर लक्षात येईल..."अशी टीका मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांचे नाव न घेता टीका केली

परदेशात जायला "त्याला" कोणी मदत केली? अजित पवारांकडून चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकार परिषद घेत तेथील महापालिकेत होत असलेल्या कारभारावर सडकून टीका केली. अनेक टेंडर मध्ये फुगवटा असल्याचं म्हणत त्यांनी प्रशासनावर टीका केली. महापालिका भ्रष्टाचाराने पोखरली आणि कर्जबाजारी केली असा घणाघात सुद्धा अजित पवार यांनी केला. पुण्यातील गुंड निलेश घायवळ आणि गुन्हेगारी विषयी बोलताना ते म्हणाले, "एका व्यक्तीला परदेशात जायला कुणी मदत केली?"

अजित पवार यांची चंद्रकांत पाटील यांचं नाव न घेता टीका करत खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या टीकेला सुद्धा उत्तर दिलं.

"...तर अजित पवार यांना अडचणी निर्माण होतील"

आज भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पुणे दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत भाजप ने आज प्रचाराचा नारळ फोडला त्यानंतर चव्हाण हे माध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांनी अजित पवारांच्या बाबत प्रश्न विचारला असता चव्हाण म्हणाले, "अजित पवारांचे हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेलं वक्तव्य आहे. अजित पवार यांनी "खुद के गिरबान मे झाकना चाहिए", त्यांनी ठरवलं पाहिजे की आपण कोणाबद्दल आरोप करत आहोत. आम्ही आरोप करायला गेलो तर अजित पवार यांना अडचणी निर्माण होतील."

रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीसमोर सोनाली आंदेकर चे आव्हान

पुण्यात प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ नाना पेठ याठिकाणी शिवसेनेच्या रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा थेट सामना माजी नगरसेवक वनराज आंदेकर ची पत्नी सोनाली आंदेकर च्या विरोधात होणार आहे. प्रतिभा धंगेकर या पहिल्यांदाच पुणे महापालिकेची निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसकडून आमदार राहिलेले रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारावेळी प्रतिभा धंगेकर मतदारसंघात प्रचार करत होत्या. यंदा धंगेकर स्वतः निवडणूक लढवणार नसले तरी सुद्धा एका प्रभागातून त्यांच्या पत्नी तर दुसऱ्या प्रभागातून त्यांचे चिरंजीव निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

प्रतिभा धंगेकर यांच्यासमोर प्रभाग क्रमांक २३ मधून राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी मिळवत सोनाली आंदेकर चे आव्हान असणार आहे. सोनाली राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी नगरसेवक राहिलेला वनराज आंदेकर ची पत्नी आहे. आयुष कोमकर खून प्रकरणात सोनाली आंदेकर ला पोलिसांनी अटक केल्यामुळे, न्यायालयाच्या विशेष परवानगीमुळे सोनाली आंदेकर या जेल मधून निवडणूक लढणार आहे. नाना पेठेत गेल्या अनेक वर्षांपासून आंदेकर टोळीची "दहशत" राहिली आहे. त्यामुळे या प्रभागावर सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

उदय सामंत यांचा सुद्धा भाजपवर हल्ला

शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी आज पुण्यात प्रचाराचा नारळ फोडला. उमेदवारांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, "उमेदवारांना माझी विनंती आहे आपल्याला कुणावर टीका करायची गरज नाही ते आपलं काम अजित पवार पूर्ण करत आहेत आपल्याला काही बोलायची गरज नाही आपण बघितलं. शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती असा सामना पुण्यात होत आहे. आपल्या समोर धनशक्ती आहे आम्ही कुणावर बोलत नाही एका पक्षाचे नाव आम्ही घेतलं नाही. संघर्ष आपल्या पाचवीला पुजलेला आहे. काही लोक पत्रकार परिषदेमुळे तिकडे जायचं विसरले पण आपण सगळीकडे जाऊ."

शेवटपर्यंत मी भाजपच्या नेत्यांशी संपर्कात होतो. त्यांना वाटलं त्यांनी केलं आम्हाला वाटलं आम्ही केलं. आम्ही ४० लोकं उमेदवार उभे करू शकत नाही असं म्हणतात पण काही दिवस मिळाले असते तर १६५ उमेदवार आम्ही दिले असते. काही काळ पुणे महापालिका राष्ट्रवादी कडे होती काही काळ भाजपकडे होती आता शिवसेनेकडे येईल. आपले मित्र पक्ष टीकेचे काम करत आहेत पण पुणेकरांना हे चालत नाही त्यांना विकास हवा आहे, असं ही सामंत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com