Pune Gangster Pared: लास्ट वॉर्निंग! पुण्यात गजानन मारणे, निलेश घायवळसह २००-३०० गुंडांची परेड, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कडक समज

Pune Gangster Pared By Police: अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच शहरातील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्तालयात मंगळवारी शहरातील कुख्यात गुंड गजानन मारणे सर्व गुन्हेगारी टोळ्यांतील सराईत गुन्हेगारांची परेड घेण्यात आली.
Pune Crime Video
Pune Crime VideoSaam Digital
Published On

अक्षय बडवे, पुणे | ता. ६ फेब्रुवारी २०२४

Pune Crime News

अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच शहरातील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्तालयात मंगळवारी शहरातील कुख्यात गुंड गजानन मारणेसर गुंडांच्या टोळ्यांतील सराईत गुन्हेगारांची परेड घेण्यात आली. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलावून सज्जड दम भरण्यात आला. नीलेश घायवळ, बाबा बोडके, बंडू आंदेकर, टिपू पठाण, कंचीले अशा प्रमुख १५ गुन्हेगारी टोळ्यांसह नव्या उभरत्या ५० टोळ्यांतील सुमारे २६७ अधिक सराईत गुन्हेगारांना परेडसाठी पोलीस आयुक्तालयात हजेरीसाठी बोलावण्यात आले होतं. (Pune Police)

कोणताही गुन्हा करायचा नाही. गुन्हेगारीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही. बेकायदेशीर कृत्यात सहभागी व्हायचे नाही, सोशल मीडियावर व्हिडिओ किंवा रील्स टाकायच्या नाहीत. राहण्याचा पत्ता किंवा मोबाईल बदलल्यास तो क्रमांक बदलल्याची माहिती पोलीस ठाण्यात किंवा गुन्हे शाखेच्या युनिटला हजर राहून कळवावी, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Crime Video
Kalyan Crime News: रस्त्यात लोकांना बोलण्यात गुंतवायचा अन् दागिने चोरून पसार व्हायचा; कल्याण क्राईम ब्रांचने ठोकल्या बेड्या

पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण भयंकर वाढलं आहे. दिवसा ढवळ्या शहरात कोयता गँग दहशत पसरवत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वेगात विकसित होणाऱ्या महत्वाच्या शहरांपैकी पुणे हे शहर आहे. एकेकाळी सुसंस्कृत, सुरक्षित आणि शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जात होत. त्याच पुण्याची आता गुन्हेगारांचं शहर अशी बनत चालली आहे. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

Pune Crime Video
Pune Crime: धक्कादायक! तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिटची चोरी; पोलीस तपास सुरू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com