Pune Crime: धक्कादायक! तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिटची चोरी; पोलीस तपास सुरू

Purandar News: शनिवार, रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी (५, फेब्रुवारी) कार्यालय उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
Purandar News:
Purandar News:Saamtv
Published On

अक्षय बडवे, पुणे|ता. ६ फेब्रुवारी २०२४

Pune Crime News:

पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शनिवार, रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी (५, फेब्रुवारी) कार्यालय उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील सासवड (Saswad) तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिटची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूममध्ये या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत.

सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवस शनिवार आणि रविवारी तहसील कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्रॉंग रूमचे कुलूप तोडण्यात आल्याचे आढळून आले. तसेच या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीनमधून एका ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरी गेल्याचे निदर्शनास आले.

Purandar News:
Junnar News : कुकडी प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; दुष्काळाची चिंता वाढली

ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिट चोरी गेले ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी पाहणी केली. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सध्या सुरू आहे.

रोहित पवारांनी साधला सरकारवर निशाणा...

दरम्यान, या प्रकरणावरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. EVM मशीन काय दूध देत नाही, पण सत्तेचं लोणी खाण्यासाठी तर मग ही चोरी झाली नसेल ना? आणि याच्याच बळावर तर 'अब की बार चार सौ पार' चा नारा दिला नसेल ना? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. (Crime News In Marathi)

Purandar News:
Nandurbar : मतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरण; तिघांना 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, दहा हजार रुपयांचा दंड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com