Nashik Crime: बहिणीबद्दल अपशब्द वापरल्याने वाद, बालपणीच्या जिवलग मित्राकडून मित्राची हत्या; नाशिकमध्ये खळबळ

Nashik News: दारूच्या नशेत आनंद इंगळे याने आनंद आंबेकरच्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत अपशब्द वापरले. यावरुन दोन्ही मित्रांमध्ये जोरदार वाद होऊन रस्त्यावरच भांडण सुरू झाले.
Nashik News
Nashik NewsSaamtv
Published On

तबरेज शेख, नाशिक|ता. ६ फेब्रुवारी २०२४

Nashik Crime News:

बहिणीबद्दल अपशब्द बोलल्याचा राग मनात धरून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात फरशी टाकून हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली. नाशिकच्या अंबड परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हत्या करणाऱ्या संशयितास पोलिसांनी एका तासात अटक केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या (Nashik) सिडको परिसरात कामाटवाडा परिसरात राहणारे आनंद इंगळे आणि आनंद आंबेकर हे लहानपणापासूनचे मित्र होते. दोघे शाळेतही बरोबर होते तर मोठे झाल्यावर बिगारी कामदेखील सोबत करायचे. काल रात्री दोघेही दारु पिण्यासाठी बसले होते.

यावेळी दारूच्या नशेत आनंद इंगळे याने आनंद आंबेकरच्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत अपशब्द वापरले. यावरुन दोन्ही मित्रांमध्ये जोरदार वाद होऊन रस्त्यावरच भांडण सुरू झाले. याच भांडणातून आनंद आंबेकर याने आनंद इंगळेच्या डोक्यात फरशी घालून त्याची हत्या केली. (Crime News In Marathi)

Nashik News
Nandurbar : मतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरण; तिघांना 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, दहा हजार रुपयांचा दंड

घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप वाघ गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नाहीद शेख सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आरोपी आनंद आंबेकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अंबड पोलीस करत आहेत. (Latest Marathi News)

Nashik News
Sant Nivruttinath Palkhi 2024 : कपाळी टिळा, गळ्यात तुळशीची माळ, त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याच्या यात्रेला सुरुवात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com