दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होता दिसत आहे. अरविंद केजरीवाल ईडीच्या समन्सला टाळाटाळ करत असताना ईडीने आज पुन्हा एकदा कारवाई केली आहे.
ईडीने आज अरविंद केजरीवाल यांचे खाजगी सचिव विभव कुमार आणि आम आदमी पक्षाशी संबंधित काहीजणांच्या घरी छापेमारी केली आहे. मनी लाँड्रिंग तपासाचा भाग म्हणून हे छापे टाकण्यात आले आहेत.
पीटीआयने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिल्लीतील जवळपास 10 ठिकाणी ही छापेमारी केली आहे. विभव कुमार आणि दिल्ली जल बोर्डाचे माजी सदस्य शलभ कुमार, आपचे खासदार एनडी गुप्ता आणि इतर काही जणांचा ठिकाणांवर ही छापेमारी सुरु आहे.
दिल्ली जल बोर्डाच्या निविदा प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी ईडी करत आहे. सीबीआय आणि दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या एफआयआरच्या आधारे ईडी कारवाई करत आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक मीटरचा पुरवठा, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग आणि कमिशनिंगसाठी निविदा काढताना दिल्ली जल बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीला झुकतं माफ दिल्याचा आरोप CBI FIR मध्ये करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.