

Pune Model code of conduct violation election : महापालिका निवडणूक प्रचारात पुण्यात आचारसंहिता भंग झाली असून पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबुराव चांदेरे यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाग ९ मध्ये पैसे वाटल्याचा आरोप केला जातोय. किरण चांदेरे पैसे वाटत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय. पुण्यातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा झाला. मतदारांना प्रभावित केल्याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
किरण चांदेरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चांदेरे यांच्या मुलासह इतर 14 जणांवर मतदार संघात मतदारांच्या याद्या घेऊन तसेच मतदारांना प्रभावित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाबुराव चांदेरे हे पुण्यातील प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवडणूक लढवत आहेत. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तसेच भारतीय न्याय संहिता कलम २२३, कलम १७१ आणि कलम ७४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बाबुराव चांदेरे यांनी मतदार संघात पैसे वाटले असल्याचा आरोप काल अनेक राजकीय पक्षांनी केला होता. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार बाबुराव चांदेरे यांच्या मुलाने पैसे वाटल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. प्रभाग ९ मधील भाजप उमदेवार गणेश कळमकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रात्री एका महिलेला पकडले, ही महिला प्रभागातील महिलांची नाव लिहून घेत असल्याचा आरोप कऱण्यात येत आहे. त्या महिलेने चांदेरे यांचे नाव घेतल्याचे व्हिडिओत दिसतेय. बाबुराव चांदेरे यांचा मुलगा किरण चांदेरेसह,सिद्धु कालशेट्टी,राजु चौकीमट परेश मुरकुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.