Municipal Election Results : मतदानाआधीच ६९ उमेदवार जिंकले; ४४ जागांवर कमळ फुलले, वाचा कुणाचे किती अन् कुठे उमेदवार बिनविरोध?

Municipal Corporation Election 2026 results before voting : महापालिका निवडणूक २०२६ पूर्वीच ६९ उमेदवार बिनविरोध निवडून आले. भाजपचे ४४, शिंदे शिवसेनेचे २२ तर राष्ट्रवादीचे २ उमेदवार विजयी झाले. संपूर्ण यादी वाचा.
Municipal Corporation Election 2026 results before voting
mahayuti Saam tv
Published On

Maharashtra municipal election unopposed candidates list : राज्यातील २९ महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. पण त्याआधीच ६९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामधील ६८ उमेदवार हे महायुतीचे आहेत. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे तब्बल ४४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या २२ उमेदवारांचा विजय निश्चित झालाय. सर्वाधिक बिनविरोध उमेदवार हे कल्याणमध्ये निवडून आले आहेत. सत्ताधारी सोडता फक्त इस्मामिक पक्षाचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलाय. अन्यथा भाजप आणि शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस अथवा शरद पवारांच्या पक्षाचा एकही उमेदवार बिनविरोध निवडून आला नाही.

कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध जिंकले?-

८ महापालिकेत भाजपचे तब्बल ४४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर एकनात शिंदेंच्या शिवसेनेचे २२ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २ उमेदवार निवडून आले. मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे.

कल्याण डोंबिवली, ठाणे, नागपूर, जळगाव, पुणे, पिंपरी चिंचवड, पनवेल, भिवंडी, धुळे, मालेगाव,अहिल्यानगर या ठिकाणी ६९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

Municipal Corporation Election 2026 results before voting
Sleep Tips : झोपा झटपट पटापट! वेळेवर झोपण्याचे ४ असे फायदे की आजार आसपासही फिरकणार नाहीत

कुणाचे कुठे बिनविरोध उमेदवार (Municipal Corporation Election 2026 Binvirodh Result)

कल्याण -डोंबिवली - २१ (भाजप- १५, शिंदे - ६)

जळगाव - १२ (भाजप- ६ ,शिंदे -६)

पनवेल - ८ (भाजप- ८)

ठाणे - ७ (शिंदे - ७)

भिवंडी - ६ (भाजप- ६)

अहिल्यानगर - ५ (भाजप- ३,राष्ट्रवादी (AP)- २)

धुळे - भाजप- ३

पुणे - भाजप- २

पिंपरी-चिंचवड - भाजप- २

मालेगाव - इस्लाम पार्टी - १

Municipal Corporation Election 2026 results before voting
Atharva Sudame : रीलमध्ये महिला प्रवाशांचा अवमान, पुण्याचा रिलस्टार अथर्व सुदामे अडचणीत, PMPL नं पाठवली नोटीस

बिनविरोध उमेदवारांची यादी- (Binvirodh Candidate List Municipal Corporation Election 2026)

भाजपचे विजयी उमेदवार -

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

  • प्रभाग १८ - रेखा चौधरी

  • प्रभाग २६ क - आसावरी नवरे

  • प्रभाग २६ ब - रंजना

  • प्रभाग २४ ब - ज्योती पाटील

  • प्रभाग २७ अ - मंदा पाटील

  • प्रभाग २६ अ -मुकुंद पेडणेकर

  • प्रभाग २७ ड -महेश पाटील

  • प्रभाग १९ क - साई शेलार

  • प्रभाग २३ क -हर्षदा भोईर

  • प्रभाग २३ अ -दीपेश म्हात्रे

  • प्रभाग २३ ड - जयेश म्हात्रे

  • प्रभाग ३० अ - रविना माळी

  • प्रभाग २५ ड - मंदार हळबे

  • प्रभाग 19 ब - डॉ.सुनिता पाटील

  • प्रभाग 19 अ - पूजा म्हात्रे

पनवेल महानगरपालिका -

  • प्रभाग १८ अ - ममता म्हात्रे

  • प्रभाग १८ ब - नितिन पाटील

  • प्रभाग १८ क - स्नेहल ढमाले

  • प्रभाग १९ अ - दर्शना भोईर

  • प्रभाग १९ ब - रूचिरा लोंढे

  • प्रभाग २० अ - अजय बहिरा

  • प्रभाग २० ब - प्रियांका कांडपिळे

भिवंडी महानगर पालिका -

  • प्रभाग १७ अ - सुमित पाटील

  • प्रभाग १६ अ - परेश चौगुले

  • प्रभाग १८ ब - दीपा मढवी

  • प्रभाग १८ अ - अश्विनी फुटाणकर

  • प्रभाग १८ क - अबू साद लल्लन

  • प्रभाग २३ ब - भारती चौधरी

धुळे महानगरपालिका

  • प्रभाग क्र १ - उज्ज्वला भोसले

  • प्रभाग ६ ब -ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील

  • प्रभाग १७ म- सुरेखा उगले़

अहिल्यानगर महानगरपालिका

  • प्रभाग 7 ब -अनिल बोरूडे

  • प्रभाग 2 ड - करण कराळे

  • प्रभाग 2 ब - सोनाबाई शिंदे

जळगाव महानगरपालिका

  • प्रभाग ७ अ - विशाल भोळे

  • प्रभाग ७ अ - दीपमाला काळे

  • प्रभाग १६ अ - डॉ वीरेन खडके

  • प्रभाग १३ क-वैशाली पाटील

  • प्रभाग ७-ब - अंकिता पाटील

  • प्रभाग १२ ब - उज्ज्वला बेंडाळे

पुणे महानगरपालिका

  • प्रभाग ३५ - मंजुषा नागपुरे

  • प्रभाग ३५ ड - श्रीकांत जगताप

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

  • प्रभाग ६ ब - रवी लांडगे

  • प्रभाग १० ब - सुप्रिया चांदगुडे

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे बिनविरोध उमेदवार

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

  • प्रभाग २४ अ - रमेश म्हात्रे

  • प्रभाग २४ ब -विश्वनाथ राणे

  • प्रभाग २४ क - वृषाली जोशी

  • प्रभाग २८ अ - हर्षल राजेश मोरे

  • प्रभाग ११ अ - रेश्मा निचळ

  • प्रभाग २८ ब - ज्योती मराठे

ठाणे महानगर पालिका -

  • प्रभाग १८ ब - जयश्री फाटक

  • प्रभाग १८ क - सुखदा मोरे

  • प्रभाग १७ अ - एकता भोईर

  • प्रभाग १८ ड - राम रेपाळे

  • प्रभाग १४ अ -शीतल ढमाले

  • प्रभाग ५ ब - जयश्री डेव्हिड

  • प्रभाग ५ अ -सुलेखा चव्हाण

जळगाव महानगर पालिका -

  • प्रतिभा देशमुख

  • विक्रम सोनवणे

  • मनोज चौधरी

  • रेखा पाटील

  • सागर सोनवणे

  • गौरव सोनवणे

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अहिल्यानगरमध्ये २ ठिकाणी यश -

  • कुमार वाकळे

  • प्रकाश भागानगरे

  • मालेगावमध्ये इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख फकीर मोहम्मद बिनविरोध निवडून आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com