pune sambhajinagar expressway Update Saam tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्याहून संभाजीनगरला फक्त २ तासात, नव्या महामार्गाची घोषणा, वाचा सरकारचा नेमका प्लान काय?

pune sambhajinagar expressway Update : पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून ५० हजार कोटींचा महामार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Pune–Sambhajinagar Elevated Highway: पुण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून उपाय योजना कऱण्यात येत आहेत. त्यासाठी ५० हजार कोटी रूपयांचा प्रकल्प हातात घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. पुणे ते संभाजीनगर हा एलिव्हेटेड महामार्ग होणार आहे. यामुळे संभीजनगर ते पुणे हे अंतर फक्त दोन ते अडीच तासात पूर्ण होईल, असे गडकरी म्हणाले. त्याशिवाय पुढील वर्षभरात महाराष्ट्रात अनेक प्रकल्पांना सुरूवात होणार आहे. त्यासाठी १.५ लाख कोटी रूपयांचा निधी देण्यात येईल, असेही गडकरी म्हणाले. ते नागपूरमध्ये बोलत होते.

संभाजीनगर ते पुणे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पण वाहतूक कोंडी अन् खराब रस्त्यांवर या मार्गावर तासंसात वाया जातात. त्यामुळेच सरकारकडून पुणे ते संभजीनगर या दोन शहरांना जोडणारा उन्नत महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गासाठी कोट्यवधी रूपये मंजूर करण्यात आले आहे. या महामार्गासाठी जमीन संपादनही लवकरच सुरू कऱण्यात येणार आहे. या महामार्गासाठी आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना गडकरींनी पुणे-संभाजीनगर या महामार्गाबाबत माहिती दिली.

पुणे ते संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा नवीन ग्रीन हायवेला मंजूरी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जुना महामार्ग चांगला केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारला याचे काम देण्यात आले आहे. याबाबतचे टेंडर काढण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीनंतर या कामाला सुरूवात होईल, असे गडकरी यांनी सांगितले.

महाराष्ट्राला आणखी एक महामार्ग, नेमका काय आहे प्लान ?

जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या काळात महाराष्ट्रामध्ये १.५ लाख कोटी रूपयांची कामे होतील,अशी माहिती गडकरींनी दिली. पुणे (आळंदी)-नाशिक फाटा एलिव्हेटिड महामार्गासाठी जवळपास ९६ टक्के जमीन संपादनाचे काम झाले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ला सोडून आणखी एक नवीन एक्सप्रेस वे तयार करणार आहे. जेएनपीटीपासून पुढे चौक पागोटे ते पुणे रिंग रोडला कनेक्ट होईल. हा महामार्ग मुंबई-बंगळुरू महामार्गाचा एक भाग आहे. महामार्ग तयार झाल्यानंतर मुंबईहून बंगळुरू हे अंतर फक्त ५ तासांत पूर्ण होईल. पुणे आणि संभाजीनगर या दोन शहरातील अंतर फक्त २ तासात पूर्ण होईल. याचे काम लवकरच सुरू होणार आहे. याला मंजूरी मिळाली असून लवकरच इतर कामाला सुरूवात होईल, अशी माहिती गडकरींनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT