Opposition Protest At Vidhan Bhavan Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO : गाजर हलवा, सरकार पळवा; विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा, एकाचवेळी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

Priya More

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (maharashtra assembly monsoon session) दुसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून गाजर दाखवून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधानभवन परिसरामध्ये गाजर आणून विरोधकांनी सरकारला गाजर दाखवत आंदोलन केले. महाराष्ट्रात गाजर हलवा आणि सरकार चालवा, गाजर हलवा सरकार पळवा, अशाप्रकराच्या घोषणा विरोधकांनी दिल्या. शेतकरी प्रश्न, उद्योग धंदे परराज्यात गेल्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.

काही वेळापूर्वी सत्ताधाऱ्यांनी आंदोलन केले होते. पण सत्ताधाऱ्यांचे हे आंदोलन विरोधकांनी हायजॅक केले आहे. विरोधकांनी गाजर दाखवत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गाजर हलवा सरकार पळवा, शेतकरी कर्जमाफी झालीच पाहीजे, या सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय, टेंडरबाज सरकारचा धिक्कार असो, अशाप्रकारच्या घोषणाबाजी विरोधकांनी केली. तसंच, अधोगती महायुती सरकार, शेजारी तुपाशी महाराष्ट्र उपाषी, अब की बार महाराष्ट्रातील उद्योगधंदे सीमापार अशाप्रकारचे बॅनर विरोधकांनी यावेळी झळकावले.

काँग्रेचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना शेतकरी प्रश्नावरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 'सरकार घोषणाबाज आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड हाल आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं रहात नाही. ते म्हणतात आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत पण ते खोटं आहे.'

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जिंतेंद्र आव्हाड यांनी देखील गाजर दाखवत सरकारवर टीका केली. 'घ्या गाजर ...घ्या गाजर, सर्व समाजाला द्या गाजर. एवढ्या वर्षात काही दिले नाही. आता काय देणार. या सरकारला सर्वांना संकटात घालवायचं आहे. गुजरात आमच्या वर गेला पण आम्ही खालती जातोय. लाज नाही वाटत यांना.', अशी टीका आव्हाडांनी केली.

तसंच, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील सरकारला शेतकरी प्रश्नावरून खडेबोल सुनावले आहेत. 'शेतकऱ्याबद्दल सहानुभूति दाखवत नाही. सहा महिने तुमचा निर्णय घेत नाही. २ महिन्यात मदत व्हायला हवी होती. म्हणजे शेतकऱ्याकडे तुमचं दुर्लक्ष होत आहे.' असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : या राशीच्या व्यक्तींचे निर्णय योग्य ठरेल, नव्या दमाने कामाला लागाल, वाचा आजचे राशीभविष्य

Mumbai Local Train : मुंबईकरांनो, नवरात्रीत बाहेर पडताय? आज रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

Rashi Bhavishya : मेषसह 5 राशींच्या भाग्यात होणार मोठा बदल, वाचा राशीभविष्य

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT