Jalgaon News: तिघांचं सरकार, एक सिनियर एक ज्युनियर, दोन बायका फजिती ऐका; खडसेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल

Eknath Khadse On Mahayuti Government: तिघांचं सरकार, एक सिनियर एक ज्युनियर, दोन बायका फजिती ऐका; खडसेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल
Eknath Khadse On Mahayuti Government
Eknath Khadse On Mahayuti GovernmentSaam Tv

>> रुपाली बडवे

Eknath Khadse On Mahayuti Government:

हे तिघांचं सरकार, एक सिनियर एक ज्युनिय, दोन बायका फजिती ऐका, असं आहे, असं राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे म्हणाले आहेत. जळगाव येथे आयोजित सभेत त्यांनी महायुतीच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ते म्हणाले, अजित पवार जे बोलतात ते करणार नेते आहेत. मात्र आता आता त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही. काय अवस्था केली. आता तुमच्या सहीनंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांचीही सही घेतली जाते. तुमचा स्वाभिमान गेला कुठे? असा सवाल खडे यांनी अजित पवार यांना केला आहे.

Eknath Khadse On Mahayuti Government
Uddhav Thackeray News : कल्याण लोकसभा मतदारसंघ आपण शाबूत ठेवायचा, श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची फिल्डिंग

एकनाथ खडसे म्हणाले, ''गेल्या एक वर्षांपासून विविध पक्षांच्या सभा या मैदानात होत आहेत. मात्र यापूर्वी एवढी मोठी सभा झाली नव्हती. येवला बीडला सभा झाली, पण त्यापेक्षा अधिक उत्साह इथे जाणवतोय.'' (Political News)

ते म्हणाले की, ''त्यांनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ज्यांनी माझ्यावर आरोप केले, ते आज मंत्री झाले. एका भ्रष्ट अधिकाऱ्यासाठी माझ्याविरोधात ठराव केला. लोड शेडींग, सिंचन, रस्ते यासाठी एकमताने ठराव करा. आता खोक्यांमुळे माज आलाय, मस्ती आली आहे.'' (Latest Marathi News)

Eknath Khadse On Mahayuti Government
Nanded Bazar Samiti : भाऊजीपेक्षा दाजी वरचढ; बाजार समितीच्या निवडणुकीत खासदाराने आमदाराला दाखवले आस्मान

याच सभेत बोलताना राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, ''एका वर्षांपूर्वी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली. स्वतःच्या ताकदीवर आपण आमदार खासदार निवडून आणू शकत नाही, हे लक्षात आल्यावर फोडाफोडीच राजकारण करण्यात आलं. शिवसेनेत फूट पाडली. ५० खोके देऊन आमदार फोडले. मात्र तोटा झाल्याच लक्षात येताच भाजपाने दुसरा प्रयोग केला. ईडीच्या धाकाने आपले राष्ट्रवादीचे आमदार भाजपासोबत गेले.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com