Nanded Bazar Samiti : भाऊजीपेक्षा दाजी वरचढ; बाजार समितीच्या निवडणुकीत खासदाराने आमदाराला दाखवले आस्मान

Political News : कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार प्रताप पाटील चिखलीकर गटाने 18 पैकी 10 जागांवर विजय मिळवला आहे.
Nanded Bajar Samiti
Nanded Bajar Samiti Saam TV

संजय सुर्यवंशी

Nanded News :

नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार या विधानसभा मतदारसंघात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा अद्यापही वरचष्मा कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार प्रताप पाटील चिखलीकर गटाने 18 पैकी 10 जागांवर विजय मिळवला आहे.

विशेष म्हणजे चिखलीकर यांचे मोठे भाऊजी असलेल्या आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी 18 पैकी 7 जागा जिंकत मतदारसंघावर काहीशी पकड असल्याचे सिद्ध केलं आहे. तर बीआरएला एका जागेवर यश मिळालं. (Latest News Marathi)

Nanded Bajar Samiti
Sanjay Shirsat News : राज्यातील एका ज्येष्ठ नेत्यानं मराठा आंदोलन चिथवलं; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा

नांदेड लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार चिखलीकर यांच्या नांदेड लोकसभा मतदारसंघात कंधार तालुका येत नाही. त्यामुळे खासदार चिखलीकर यांच्या गटाचे बहुमताचे यश उजळून निघालं आहे. कंधार विधानसभा मतदारसंघात चिखलीकर यांची ताकत कायम असल्याचे या निवडणुकीच्या निमित्ताने उघड झालं आहे. (Political News)

त्यामुळे आगामी काळात कंधार विधानसभा मतदारसंघात दाजी-भाऊजीचा संघर्ष आणखीन तीव्र होणार असल्याचे चित्र आहे. मन्याड खोऱ्याचे राजकारण चांगलंच तापणार आहे. खासदार चिखलीकर यांनी यावेळेस आपल्या पुत्राला या बाजार समितीच्या निवडणुकीचे सर्व सूत्र हाती दिले होते.

Nanded Bajar Samiti
Wai Satara Maratha Morcha : सकल मराठा समाज वाई - सातारा पायी माेर्चा, आंदाेलकांना पाचवडनजीक पाेलिसांनी राेखले; प्रशासन-समन्वयकांची चर्चा सुरु

आगमी विधानसभेत त्यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर हे कंधार लोहा मतदारसंघातून आपलं नशीब आजमावणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक प्रवीण पाटील चिखलीकर यांच्यासाठी देखील तेव्हढीच महत्वाची होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com