Uddhav Thackeray News : कल्याण लोकसभा मतदारसंघ आपण शाबूत ठेवायचा, श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची फिल्डिंग

Political News : कल्याण लोकसभा मतदारसंघ 1996 साली भाजपकडून भांडून आपण घेतला होता.
Shrikant Shinde Visit Shiv Sena
Shrikant Shinde Visit Shiv Sena Saam Tv
Published On

गिरीश कांबळे

Kalyan News :

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.

केंद्र सरकारने तातडीचं अधिवेशन बोलवलं आहे, त्यामुळे लवकरच निवडणुका लागू शकतात. त्या दृष्टीने आपली तयारी असायला हवी, असा सूचना उद्धव ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Shrikant Shinde Visit Shiv Sena
Sanjay Shirsat News : राज्यातील एका ज्येष्ठ नेत्यानं मराठा आंदोलन चिथवलं; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा

कल्याण लोकसभा मतदारसंघ 1996 साली भाजपकडून भांडून आपण घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा ही लोकसभेची जागा आपण लढून हा लोकसभा मतदारसंघ शाबूत ठेवायचा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. (Political News)

समोरच्याची ताकद कितीही असू द्या, आपण तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून प्रचार करा. स्थानिक पदाधिकाऱ्यांना भेटून आपली संघटना आणखी मजबूत करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत नेत्यांना दिले. (Latest Marathi News)

Shrikant Shinde Visit Shiv Sena
Nanded Bazar Samiti : भाऊजीपेक्षा दाजी वरचढ; बाजार समितीच्या निवडणुकीत खासदाराने आमदाराला दाखवले आस्मान

इंडिया आघाडीच्या बैठकीचे यजमानपद आपल्याकडे होतं. त्यामुळे इंडिया आघाडीत असताना मला काही ठिकाणी दौरे करावे लागतील. माझं आपल्या मतदारसंघात येणं जाणं काही प्रमाणात कमी होईल. तरीदेखील तुम्ही जोमाने तयारी करा. अशा प्रकारची चर्चा उद्धव ठाकरेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीत आपल्या नेत्यांशी, पदाधिकाऱ्यांशी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com