Shaktipeeth Expressway Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: ठेकेदारांसाठी 'शक्तिपीठ'चा घाट, विरोध डावलून महामार्ग कशाला? अधिवेशनात तापला मुद्दा

Shaktipeeth Expressway: प्रस्तावित 'शक्तिपीठ' महामार्गा विरोधात राज्यात आंदोलन होत असतानाच अधिवेशनातही हा मुद्दा तापला आहे. महामार्ग केवळ ठेकेदारांच्या भल्यासाठी असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. समृद्धीचा अनुभव बघता सत्ताधारी आता या महामार्गाच्या कामावरुन सावध भूमिका घेत आहेत.

Girish Nikam

मुंबई-नागपूर ७०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग कार्यान्वित झालाय. मात्र महामार्गावरील सततच्या अपघातांनी आणि कामाच्या गुणवत्तेवरुन सत्ताधा-यांना धारेवर धरलं जातंय. समृद्धीचा ताजा अभुवन असतानाच आता या महामार्गापेक्षा जास्त लांबीच्या शक्तीपीठ महामार्गाचा सरकारकडून घाट घातला जातोय. मात्र अनेक जिल्ह्यातून त्याला तीव्र विरोध होतोय.

कोल्हापूर, सांगलीत तर सर्वपक्षिय नेते रस्त्यावर उतरलेत. शुक्रवारी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटलेत. पायऱ्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी केली. आमदार सतेज पाटलांनी हा महामार्ग केवळ ठेकेदारांसाठी तयार केला जात असल्याचा आरोप केलाय. तर सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय होईल, असं मंत्री दादा भूसे म्हणालेत.

समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोडणारा महामार्ग असावा, यातून एमएसआरडीसीने या महामार्गाची संकल्पना पुढे आणली. त्यातही देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा उद्देश आहे. प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'शक्तिपीठ' महामार्गाविरोधात नुकतच काँग्रेसनं आंदोलन केलं. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सत्ताधारी शिवसेनेचे खासदार धैर्यशील मानेही उपस्थित होते..त्यांनीही सरकारला घरचा आहेर दिलाय.

प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग सिंधुदूर्गातील पत्रादेवी बांदा ते वर्ध्यातील दीग्रज असा 805 किमीचा मार्ग आहे. सहा-लेन प्रवेश-नियंत्रित द्रुतगती मार्ग आहे. त्यासाठी 86 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. हा महामार्ग महाराष्ट्रातील 12 आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाणार आहे.

शेतकऱ्यांचा विरोध असूनही शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जातोय. येत्या विधानसभा निवडणुकीतही यावरुन राजकारण होत विरोधक 'शक्तिपीठ' महामार्गावर सरकारची कोंडी करणार, असं चिन्ह आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT