Kurla BEST Bus Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Kurla BEST Bus Accident: चूक कुणाची? ट्रेनिंग नसतानाही हातात स्टेअरिंग दिली, कुर्ला बस अपघात प्रकरणातील धक्कादायक माहिती

Kurla Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणाच्या तपासादरम्यान धक्कादायक माहिती उघड झाली आहे. चालकाला ऑटोमॅटकि बस चालवता येत नसताना देखील त्याच्या हातामध्ये देण्यात आली.

Priya More

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कामावर रूजू झाल्यापासून चालक संजय मोरेने ९ दिवस मॅन्युअल बस चालवली पण अपघाताच्या काही तासांपूर्वी चालकाला ऑटोमॅटीक बस चालवण्यासाठी दिली. या बसचा अंदाज नसतानाही चालकाने आगाराबाहेर बस काढली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच कुर्ला एलबीएस रोडवर या बसने अनेकांना चिरडले. या अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू तर ४९ जण जखमी झाले. या अपघाताचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

तपासातून उघड झालेल्या माहितीनुसार, चालक संजय मोरे हा १ डिसेंबर रोजी कंत्राटीपद्धतीने कामावर रूजू झाला होता. मोरया या कंपनीनेने बेस्टला हा चालक दिला होता. मोरया ही कंपनी बेस्टला चालक देण्याचे काम करते. रूजू झाल्यानंतर ३ महिन्यांचे ट्रेनिंग चालकाला दिले जाते पण संजय मोरे यांना ट्रेनिंग दिले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संजय मोरेने ९ दिवसांत ४ वेळा मॅन्युअल बस चालवली असून सोमवारी दुपारी २ वाजता ड्यूटीवर आल्यानंतर ४ वाजता एक मॅन्युअल बस घेऊन तो निघाला. ती बस घेऊन तो ७:४५ च्या सुमारास पुन्हा कुर्ला आगारात आला. तिकडे एक तास आराम करून तो पुन्हा बस चालवायला निघाला. मात्र तेव्हा त्याला ऑटोमॅटीक बस चालवायला दिली. त्या बसचा अंदाज न घेता त्याने बस आगाराच्या बाहेर काढली. त्यानंतर ही अपघाताची घटना घडली.

पोलिसांनी इलेक्ट्रिक बस बनवणारी कंपनी आणि काही तज्ञांशी संवाद साधला. इलेक्ट्रिक बस पूर्णपणे सुस्थितीत आहे बसमध्ये कुठलाही बिघाड नसल्याचे समोर आले आहे. इलेक्ट्रिक बसमध्ये ब्रेक फेल झाल्यावर किंवा काही मोठा तांत्रिक बिघाड झाल्यास बस पुढे जात नाही असा तज्ज्ञांचा दावा आहे. बेस्टकडे असलेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये ही व्यवस्था आहे त्यामुळे अपघातग्रस्त बसचे ब्रेक फेल झाल्याचा दावा खोटा असल्याची माहिती तज्ज्ञांनी पोलिसांना दिली.

दरम्यान, कुर्ला बस अपघातातील आरोपी संजय मोरेला ३ वाजता कुर्ला कोर्टात हजर करणार असल्याची पोलिसांनी दिली आहे. या अपघातामध्ये ४ पोलिस देखील जखमी झाले आहेत. अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू तर ४९ जण जखमी झाले आहेत. जखमींवर भाभा आणि सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. या अपघाताचे धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sansad Ratna Award 2025 : महाराष्ट्रातील ७ खासदारांनी दिल्लीत नाव गाजवलं; सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह निशिकांत दुबेंनाही संसदरत्न पुरस्कार

Best Indian Patriotic Movies: या विकेंडला बघा देशभक्ती जागवणारे हे ७ चित्रपट

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

Jasprit Bumrah Retirement : टीम इंडियाला मोठा हादरा! जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

Nashik Food : नाशिकच्या Top 7 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

SCROLL FOR NEXT