Thackeray Group: कुर्ला मतदारसंघावरून राजकारण तापलं; ठाकरे गटाच्या संभावित उमेदवारावरून संभाजी ब्रिगेड, शिंदे गट आक्रमक

Mumbai Politics: कुर्ला विधानसभा मतदारसांघावरून राजकरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाच्या संभावित उमेदवारावरून संभाजी ब्रिगेड आणि शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
कुर्ला मतदारसंघावरून राजकरण तापलं; ठाकरे गटाच्या संभावित उमेदवारावरून संभाजी ब्रिगेड, शिंदे गट आक्रमक
Uddhav Thackeray Telegraph
Published On

कुर्ला विधानसभा मतदारसंघात घडलेल्या घडामोडींमुळे आता शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे. अलीकडेच ठाकरे गटाचा मित्र पक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडने उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत आपली नाराजी व्यक्त केली होती. कुर्ला विधानसभा मतदारसांघातून ठाकरे गट माजी नगरसेविका प्रविणा मनीष मोरजकर यांना उमेदवारी देऊ शकते, अशी चर्चा आहे. यावरूनच संभाजी ब्रिगेडने नाराजी व्यक्त केली आहे.

संभाजी ब्रिगेडचे मुंबई अध्यक्ष सुहास राणे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत म्हटलं होतं की, ''प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजाच्या लोकांवर दाखल केलेल्या खोट्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमुळे त्यांच्या विरोधात मराठा समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. अशा व्यक्तीला कुर्ला विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून आपण पाहत असल्याची बातमी समोर आल्याने मराठा समाज प्रचंड दुखावला आहे.'' याच वादात आता शिंदे गटाने उडी घेतली आहे.

कुर्ला मतदारसंघावरून राजकरण तापलं; ठाकरे गटाच्या संभावित उमेदवारावरून संभाजी ब्रिगेड, शिंदे गट आक्रमक
Maharashtra Politics: लोकसभेत फटका, विधानसभेत सावध पवित्रा! भाजपने विधानसभेसाठी काय केली आहे मायक्रो प्लॅनिंग? जाणून घ्या

शिंद गटाने यावरूनच ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते अरुण सावंत म्हणाले आहेत की, ''ठाकरे गटाला एकीकडे मराठा समाजाची मत खायची आहेत आणि दुसरीकडे मराठा समाजावर खोट्या ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करणाऱ्या माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर सारख्या व्यक्तीला उमेदवारी ही द्यायची आहे. ठाकरे गटाची मराठा समाजाबाबत दुट्टपी भूमिका बजावते'', असा आरोप त्यांनी केला आहे.

अरुण सावंत म्हणाले आहेत की, ''संभाजी ब्रिगेडनेही याचा निषेध केला आहे. अशी दुट्टपी बजावणाऱ्या ठाकरे गटाविरोधात महाराष्ट्राची जनता यावेळी निर्णय घेईल.''

कुर्ला मतदारसंघावरून राजकरण तापलं; ठाकरे गटाच्या संभावित उमेदवारावरून संभाजी ब्रिगेड, शिंदे गट आक्रमक
Maharashtra Politics: लोकसभेत फटका, विधानसभेत सावध पवित्रा! भाजपने विधानसभेसाठी काय केली आहे मायक्रो प्लॅनिंग? जाणून घ्या

दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे मुंबई अध्यक्ष सुहास राणे यांनी ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हटलं होतं की, ''मराठा समाजाला खोट्या अॅट्रॉसिटीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकवून त्रास देणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देऊ नये, अशी आमची कळकळीची विनंती आहे.'' या संपूर्ण प्रकरणावर अद्याप ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिलेली नाही आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com