Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Shalimar Kurla express Derailed update : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्याची घटना घडलीये. या घटनेमुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
Shalimar Express derails in Maharashtra's Nagpur
Shalimar Kurla express Derailed Saam tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

नागपूर : रेल्वे सेवेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शालिमार-कुर्ला शालिमार एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी टिटवाळा-सीएमसटी लोकलचा शेवटचा गार्ड डबा रुळावरून घसरला होता. त्यानंतर नागपूरमध्ये एक्स्प्रेसचा डबे घसरल्याची घटना घडली आहे. देशात वारंवार रेल्वेचे डबे घसरू लागल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी टिटवाळा-सीएसएमटी लोकल ट्रेनचा शेवटचा डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज मंगळवारी शालिमार कुर्ला एक्स्प्रेसचा डबे घसरल्याची घटना घडली. नागपूरला जात असताना कमळना भागातून काही अंतरावर अचानक रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले. रेल्वेचे एस टू आणि पार्सलचा एक डबा घसरा आहे. एक्स्प्रेसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

Shalimar Express derails in Maharashtra's Nagpur
Nagpur News: 'विधवा सूनही सासरची मुलगीच'; कोर्टाचे महत्वाचे निर्देश, काय आहे प्रकरण?

रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरु

शालिमार एक्स्प्रेसचे डबे घसरल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर रेल्वे प्रशासनाचे काम सुरु आहे. या घटनेमुळे या मार्गावरील काही रेल्वे प्रभावित झाल्या आहेत. तसेच काही रेल्वेचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या मार्गावरील दुरुस्तीचं काम हे युद्धपातळीवर सुरु आहे. या मार्गावरील सेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी दोन ते तीन तासांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Shalimar Express derails in Maharashtra's Nagpur
Accident CCTV Footage: आधी आई आणि मुलीला कारनं उडवलं; नंतर रिक्षाला धडकला; दिल्लीच्या रस्त्यावरचा थरार

दरम्यान, मागील काही दिवसांत रेल्वे आणि लोकलचे डबे घसरण्याची घटना घडली आहे. त्यामुळे वारंवार रेल्वेचे डबे घसरू लागल्याने प्रवाशांची चिंता वाढली आहे. या वाढत्या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन्ही घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, रेल्वेचे डबे रुळावरून घसरू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने दक्षता घेतली पाहिजे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com