Accident CCTV Footage: आधी आई आणि मुलीला कारनं उडवलं; नंतर रिक्षाला धडकला; दिल्लीच्या रस्त्यावरचा थरार

Delhi Accident CCTV Footage: दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीतील शालीमार बागेत एक कारने सिलिंडरने भरलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
Accident CCTV Footage
Accident CCTV FootageSaam Tv
Published On

Delhi Shalimar Bagh Accident News:

दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीतील शालीमार बागेत एक कारने सिलेंडरने भरलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक कार वेगात येताना दिसत आहे. ही कार थेट रसत्याने जाणाऱ्या रिक्षाला लागली. ही रिक्षा हाताने ओढली जायची. या रिक्षात सिलिंडर होते. या धडकेत सिलेंडर एकमेकांवर आदळत बाहेर फेकले गेले. या घटनेने आजूबाजूच्या रसत्याने जाणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. सुदैवाने या अपघातात सिलिंडरचा स्फोट धाला नाही.

या व्हिडिओत रिक्षाला जोरदार धडक बसते. त्यानंतर सिलिंडर हवेत उडून खाली पडतात. तसेच पुढे ही रिक्षा एका कारला धडकते. रिक्षाचालकही काही अंतरावर जाऊन पडतो. यात रिक्षाचालक जखमी झाला आहे.

एका रिपोर्टनुसार, ही कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. या अपघातात रिक्षाचलकासह रस्त्यावरील इतर लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.

Accident CCTV Footage
China Earthquake CCTV : चीन भूकंपाने हादरला; किंचाळ्या अन् पळापळ... भयानक दृश्ये CCTV कॅमेरात कैद

शालीमार बागेत रिक्षाला धडक देण्यापूर्वी या कारचालकाने ६ वर्षीय मुलगी आणि तिच्या आईला धडक दिली होती. या दोघांना धडक दिल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याने सिलेंडरने भरलेल्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात आई आणि मुलगी जखमी झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी असलेल्या लोकांनी कारचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जात आहे.

Accident CCTV Footage
MP Suspensions: मोदी सरकारने २५ वेळा केली निलंबनाची कारवाई; २० वर्षात ३७४ खासदारांवर कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com