Maratha Reservation: आरक्षणासाठी आत्महत्या, २२ वर्षीय रिक्षा ड्रायव्हर तरुणाने संपवलं आयुष्य; बीडमध्ये खळबळ

Beed News: एकीकडे मराठा आरक्षणासाठी सरकारकडून हालचाली सुरू असतानाच मराठा बांधवांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी एका 22 वर्षीय ऑटोरिक्षा चालक तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीयं.
Maratha Reservation
Maratha ReservationSaamtv
Published On

Maratha Reservation News:

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लक्षवेधी लढा उभारत सरकारला जेरीस धरले आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी सरकारकडून हालचाली सुरू असतानाच मराठा बांधवांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी एका 22 वर्षीय ऑटोरिक्षा चालक तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीयं.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) एका 22 वर्षीय ऑटोरिक्षा चालक तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या (Beed) धारूर तालुक्यात असणाऱ्या देवठाणा गावात उघडकीस आली आहे. प्रवीण बाबुराव सोळंके वय 22 रा. देवठाणा असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

मृत प्रवीणच्या खिशात एक चिठ्ठी देखील सापडलीय त्यावर "मी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करत आहे." असा मजकूर लिहिलेला आहे. याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची आकस्मित नोंद करण्यात आली असून पुढील तपास एपीआय दहिफळे करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation
Gopichand Padalkar: '...तर त्यांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते', चप्पलफेक प्रकणावरून पडळकरांनी दिली संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा लढा सध्या चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांचा राज्यभरात सभांचा धडाका सुरू आहे. या सभांमधून ते मराठा आरक्षणासाठी आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. तसेच जरांगे पाटलांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटमही दिला आहे. (Latest Marathi News)

Maratha Reservation
Samruddhi Mahamarg: एका वर्षाची समृद्धी! ५५ लाख वाहने, ४२५ कोटी महसूल; अपघात अन् मृत्यूंचा आकडा धडकी भरवणारा; स्पेशल रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com