Manoj Jarange Patil on Chhagan bhujbal: 'मला सरपंच...'; छगन भुजबळांच्या आव्हानाला मनोज जरांगे यांचं उत्तर

Manoj Jarange Patil on Chhagan bhujbal: 'भुजबळांच्या आव्हानाला आता मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं आहे. 'मला सरपंच वगैरे काही व्हायचं नाही, अशा शब्दात जरांगे यांनी मंत्री भुजबळांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Manoj Jarange Patil VS Chhagan Bhujbal
Manoj Jarange Patil VS Chhagan Bhujbal Saam TV
Published On

संदिप भोसले, लातूर

Manoj Jarange Patil Latest News:

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. छगन भुजबळांनी इंदापुरातील सभेत मनोज जरांगे यांना ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखवा, असं आव्हान दिलं. भुजबळांच्या आव्हानाला आता मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं आहे. 'मला सरपंच वगैरे काही व्हायचं नाही, अशा शब्दात जरांगे यांनी मंत्री भुजबळांना प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे पाटील हे लातूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

उशिरा रात्री आयोजित करण्यात येणाऱ्या सभेवर भाष्य करताना जरांगे पाटील म्हणाले, 'छगन भुजबळांना दुसरं काम नाही राहीलं. अजित पवारांनी त्यांना समज द्यावी. अन्यथा मी पुन्हा सुरु करेन. पोलीस प्रशासनाचं काम असतं शांतता राखणे, पण आम्ही रात्री उशिरा सभा घेतो, पण शांततेत प्रशासनाला सहकार्य करून घेत असतो'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil VS Chhagan Bhujbal
Sharad Pawar On Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी विरोधात आता शरद पवार मैदानात, रास्तारोको करणार

'मी महापौर झालो आमदार झालो, जरांगे यांनी सरपंच होऊन दाखवावं, छगन भुजबळ यांच्या या आव्हानाला प्रत्युत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले, 'आम्हाला असलं काही व्हायचं नाही. तुम्ही झाला ते पाप फेडून आलात. त्यामुळे मला सरपंच वगैरे काही व्हायचं नाही'.

Manoj Jarange Patil VS Chhagan Bhujbal
Ajit Pawar Convoy : मोठी बातमी : अमरावतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

'जनगणनेवर आधारित आरक्षण द्यावे, आतापर्यंत नोंदीवर आरक्षण दिले ते शासनाने रद्द करा, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. त्यावर जरांगे म्हणाले की, कायद्याने दिलेलं आरक्षण रद्द होत नाही. आमचं जर आरक्षण रद्द झालं. तर कुठे जात आणि आर्थिक निकषावर दिलेलं आरक्षणही ठीक नाही. आमचं तर पुरव्यानीशी नोंदी सापडलेल्या आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com