Sharad Pawar On Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी विरोधात आता शरद पवार मैदानात, रास्तारोको करणार

Sharad Pawar latest news: केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील शेतकरी आक्रमक झालेला असताना, आता स्वतः शरद पवार या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Digital
Published On

Sharad Pawar On Ban on Onion Export :

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील शेतकरी आक्रमक झालेला असताना, आता स्वतः शरद पवार या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) सोमवारी रास्ता रोको करणार आहे. (Latest Marathi News)

वाढत्या किंमती नियंत्रणात ठेवण्याबरोबरच देशातील उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मार्च २०२४ पर्यंत ही बंदी असणार आहे. मात्र, या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटना प्रचंड आक्रमक झाल्या आहेत.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी तीव्र आंदोलने करण्यात येत आहेत. सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. अनेक ठिकाणी रास्ता रोको करून सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

शरद पवार गट रास्तारोको करणार

सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः रस्त्यावर उतरणार आहेत. पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पक्षाकडून रास्ता रोको करण्यात येणार आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड चौफुली येथे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हे रास्तारोको आंदोलन केले जाणार आहे. केंद्राच्या कांदा निर्यातबंदी निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

Maharashtra Politics
Chhagan Bhujbal News: जरांगेंच्या डोक्यात हवा गेलीय, त्यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखवावं; छगन भुजबळ यांचं ओपन चॅलेंज

केंद्र शासनाकडून ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी

केंद्र शासनाकडून ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. कांद्यावरील वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने निर्यात बंदी घातली आहे. सरकारच्या निर्णयामुळे लासलगाव, मनमाड, नांदगाव समितीतील लिलाव बंद आहेत.

तत्पूर्वी, दिल्लीतील बाजारात स्थानिक विक्रेते ७० ते ८० रुपयांना कांदा विक्री करत आहेत. मात्र, सरकारच्या निर्यात बंदी केल्याने कांदा दरात घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे सरकारच्या कांदा निर्यात बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com