Kurla BEST Bus Accident Update Saam Tv
मुंबई/पुणे

BEST Bus Accident : अनुभव नव्हता, पहिल्यांदाच स्टेअरिंग हातात घेतलं अन्...., तपासातून धक्कादायक माहिती उघड

Kurla BEST Bus Accident Update: बसध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता ही धक्कादायक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.

Priya More

सूरज मसूरकर, मुंबई

मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये बेस्टच्या बसला भीषण अपघात झाला. भरधाव बस थेट मार्केटमध्ये घुसली. या बसने अनेक वाहनांना चिरडलं. या अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. अपघातामध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू तर ४९ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील जखमींवर भाभा आणि सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता ही धक्कादायक माहिती चौकशीनंतर समोर आली आहे. मात्र बसचा वेग आपोआप वाढू लागला आणि ब्रेक फेल झाल्याचा चालकाने दावा केला होता. बस चालक हा कंत्राटाद्वारे नेमण्यात आला होता. चालक संजय मोरे (५४ वर्षे) काही दिवसांपूर्वी म्हणजेच १ डिसेंबर रोजी कामावर रूजू झाल्याची माहिती समोर आली आहे. कंत्राटपदावर भरती झालेला चालक आधी खासगी बस चालवत होता. त्याला मोठ्या बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातातील चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तो कंत्राटी चालक म्हणून १ डिसेंबरला कामावर रुजू झाला होता. त्याने सोमवारी पहिल्यांदाच बेस्ट बस चालवली. हा चालक लहान वाहनं चालवायचा. मोठी वाहनं चालवण्याचा त्याला कोणताही अनुभव नव्हता.

कुर्ला बस अपघाताप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. अपघातग्रस्त बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नसल्याचे तपासातून उघड झाले. तसंच, चालकाने मद्यपान केलेले नव्हते. अपघातग्रस्त बस चालक संजय मोरेला अटक करण्यात आली असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. ड्रायव्हरविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. संजय मोरेची नेमणूक करणाऱ्यांची चौकशी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : डोकं रिक्षावर आपटलं, फरफडत नेलं; ४ वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण, वसईचा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल!

भोंदू बाबा अशोक खरातवर शिर्डीत गुन्हा दाखल; 4 एकर भूखंड बळकावला|VIDEO

Dhurandhar 2 Collection : जगभरात 'धुरंधर 2'चा धुमाकूळ; 1,400 कोटींच्या उंबरठ्यावर, रणवीर सिंहने रचला इतिहास

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपासमोर ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा

Blood Pressure: ब्लड प्रेशर तपासताना या चूका करणं लगेचच थांबवा, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT