Surabhi Jayashree Jagdish
ट्रेनमधील तो हातोडा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असलेल्या आपत्कालीन व्यवस्थेचा एक भाग आहे. त्याचा वापर नेहमीच्या प्रवासात करण्यासाठी नसून आपत्कालीन परिस्थितीत करण्यासाठी केला जातो. एखादा मोठा अपघात झाला किंवा डब्यात आग लागली आणि दरवाजातून बाहेर पडणं कठीण झालं, तर तो हातोडा उपयोगी पडतो.
भारतीय रेल्वेच्या रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन म्हणजेच RDSOनुसार, प्रवासी डब्यांमध्ये काही खिडक्या आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गासाठी तयार केल्या जातात. मुख्य दरवाजातून सुरक्षितपणे बाहेर पडणं शक्य नसेल तर अशा खिडक्यांमधून प्रवाशांना डब्याबाहेर जाता येऊ शकतं.
टेम्पर्ड ग्लास वापरलेल्या आपत्कालीन खिडकीची काच गरज पडल्यास तो हातोडा वापरून फोडता येते. काही प्रकारच्या लॅमिनेटेड ग्लाससाठीही आपत्कालीन परिस्थितीत हातोड्याच्या मदतीने काच तोडता येईल अशी व्यवस्था केली जाऊ शकते.
ट्रेनच्या डब्यात असलेली प्रत्येक खिडकी ही आपत्कालीन बाहेर पडण्यासाठी वापरता येईल अशी नसते. RDSOच्या LHB कोच मॅन्युअलनुसार, एका कोचमध्ये चार आपत्कालीन उघडता येणाऱ्या खिडक्या दिल्या जातात. या खिडक्यांचा उपयोग आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना डब्यातून बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग देण्यासाठी केला जातो.
आपत्कालीन खिडक्या सामान्य खिडक्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने तयार केलेल्या असतात. त्यांना आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी प्रवाशांना आवश्यक सूचना दिलेल्या असतात. त्यामुळे डब्यातील कोणती खिडकी आपत्कालीन बाहेर पडण्यासाठी आहे, हे त्या खिडकीवरील सूचनांवरून समजू शकतं.
ट्रेनचा अपघात झाला किंवा डब्यात आग लागली, तर दरवाजापर्यंत पोहोचणं अनेकदा कठीण होऊ शकतं. गर्दी, धूर, डब्याची झालेली हानी किंवा इतर अडथळ्यांमुळे नेहमीच्या मार्गाने बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध नसेल, तर आपत्कालीन खिडकी उपयोगी ठरू शकते.
त्या हातोड्याचा उद्देश गरज पडल्यास आपत्कालीन खिडकीची काच फोडून बाहेर पडण्याचा मार्ग तयार करणं हा आहे. त्यामुळे सामान्य प्रवासात कुतूहल म्हणून किंवा गंमत म्हणून तो हातोडा काढून काच फोडणं योग्य नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.