एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजातील संघर्ष, आरक्षणाचा मुद्दा आणि आगामी आंदोलनाबाबत जरांगे पाटील यांनी काय इशारा दिला, जाणून घ्या.
Manoj Jarange Patil, Maratha reservation
Manoj Jarange Patil, Maratha reservationSaam TV
Published On

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आणि मराठ्यांमध्येच दंगल घडवण्याचे पाप करत आहेत, असा खळबळजनक आणि थेट आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. अंतरवली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जरांगे पाटील यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत गंभीर परिणामांचा इशारा दिला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये षडयंत्राचा आरोप

मंत्री उदय सामंत, आमदार संजय शिरसाट आणि भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर मनोज जरांगे पटील यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, हे लोक छत्रपती संभाजीनगरमध्ये बसून तीन दिवसांपासून राजकीय स्टंट आणि षडयंत्र रचत आहेत. उदय सामंत आणि संजय शिरसाट यांच्यात फोनवर काय संभाषण झाले, हे सर्वांना ठाऊक आहे. सत्ताधाऱ्यांनी गुंड पाळले असून ते आमच्या अंगावर सोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Manoj Jarange Patil, Maratha reservation
Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

प्रमाणपत्रे रद्द केल्याचा थेट दावा

एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांनी ठरवून मराठ्यांना मिळणारी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा ते एका फटक्यात संपतील. तुम्ही सत्तेत आहात म्हणून आम्ही तुम्हाला मोजत नाही, उद्या सत्तेत नसल्यावर काय मोजणार? असा थेट इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

गुंडगिरीचा काळ संपला

गुंडगिरी आणि धमकीच्या भाषेला उत्तर देताना ते म्हणाले, गोपीनाथ मुंडे आणि आर. आर. आबांनी राज्यातील अंडरवर्ल्ड संपवले आहे, आता उरलेले गुंड आम्ही दगडाखाली ठेचून संपवू. पाच हजारात पोरे 'ठ्याव ठ्याव' करतात, त्यामुळे आम्हाला अंडरवर्ल्डच्या धमक्या दाखवू नका. रस्त्यावर येऊन दम दाखवणाऱ्यांना मराठ्यांची पोरे योग्य तो रट्टा देतील.

Manoj Jarange Patil, Maratha reservation
मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

राजकीय भविष्यावर भाष्य

शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील अंतर्गत समीकरणांवरही मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले. जरांगे पाटील म्हणाले, उदय सामंत आणि प्रताप सरनाईक हे उद्या एकनाथ शिंदेंची साथ सोडून भाजपमध्ये आणि देवेंद्र फडणवीसांच्या गोटात दिसतील. फडणवीस मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाहीत, हे सत्ताधाऱ्यांनी उघडपणे सांगावे.

संयमाचा बांध सुटल्याचा इशारा

उपोषणाने आणि प्रशासनाच्या वेळकाढूपणाने आम्ही कदरलो आहोत. आता मराठा समाजाचा संयम सुटला आहे. सत्ताधारी मराठ्यांचे मुडदे पाडण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा गंभीर इशारा जरांगे पाटील यांनी दिला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढची दिशा अधिक आक्रमक असण्याचे संकेत दिले आहेत. १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीनंतर मुंबईतील आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे यावेळी जरांगे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com