पुण्यातील खेड तालुक्यातील कुंडेश्वर दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात ९ महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर २२ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या दुर्दैवी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीच पिकअप गाडीत गाणी म्हणत, हसत-खेळत भगिनी कुंडेश्वराच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. भक्तिभावाने सुरू झालेला प्रवास क्षणात शेवटचा ठरला. त्या महिलांचा अपघाताआधीचा व्हिडिओ समोर आला आहे. विठ्ठलाचे नामस्मरण करत निघालेल्या महिलांवर काळाचा घाला घातलाय.
पुण्याच्या खेड तालुक्यातील पाईट येथील कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात असताना महिलांना घेऊन जाणारी पिकअप वाहन खोल दरीत कोसळलं. या भीषण अपघातात ९ महिलांचा मृत्यू झाला. भाविकांनी खचाखच भरलेले वाहन दरीत कोसळल्याने दुर्दैवी अपघात झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं.
श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारनिमित्त भाविक कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात होते. नागमोडी वळणावर घाट चढताना पिकअप रिटर्न आल्याने भाविकांचं वाहन थेट १०० फूट खोल दरीत कोसळलं. या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले.
अपघातात मृत पावलेल्या महिलांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. अपघातात २० हून अधिक जखमी झाले. त्यांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने तेथील पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून विचारपूस केली.
पिकअपमध्ये दाटीवाटीने महिला बसल्या होत्या. या वाहनात लहान मुलांचाही समावेश होता. देव दर्शनासाठी निघालेल्या महिला पंढरीच्या विठुरायाचा गजर करत निघाल्या होत्या. पंढरीतील विठ्ठलांचं स्मरण करत महिला देव दर्शनासाठी निघाल्या होत्या. भक्तीमय वातावरणात निघालेल्या महिलांचा अपघात झाला. या अपघातातील महिलांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.