Dadar Kabutar khana : दादर कबूतरखान्यावरून 'फडफड' सुरुच; जैन मुनींचा शस्त्र उचलण्याचा इशारा, कोर्टालाही उघड धमकी? VIDEO

jain muni on Dadar Kabutar khana : दादर कबूतरखान्यावरून वातावरण तापलं आहे. यावरून जैन मुनींनी शस्त्र उचलण्याचा इशारा दिला आहे.
 Dadar Kabutar khana
jain muni on Dadar Kabutar khana :Saam tv
Published On

मुंबईच्या दादर येथील कबूतरखान्यावरून वाद पेटला आहे. कोर्टाच्या कबूतरखान्यात कबूतरांना खाऊ घालण्यावर बंदी घातल्याने जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. जैन मुनी निलेशचंद्र यांनी १३ तारखेला पुन्हा जैन समाज उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. शांतताप्रिय असणारा समाज शस्त्रही हातात घेईल, कोर्टाच्या आदेशाला जुमानणार नाही, अशी धमकी जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिली आहे.

गेल्या दिवसांपासून दादरमधील कबूरतखान्याचा विषय चर्चेत आहे. कबूतरांना खाऊ घालण्याऱ्यांकडून दंडाची वसुली केली जात आहे. मुंबईतील विविध भागात जैन समाजातील लोकांनी नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. आता जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. जैनी मुनी यांच्या भूमिकेमुळे वाद आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 Dadar Kabutar khana
Mumbai Crime : 80 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या डोक्यात प्रेमाचं खुळ शिरलं; ४ महिलांवर मन जडलं, नको त्या नादात गमावले 9,00,00,000 रुपये

जैन मुनी काय म्हणाले?

जैन मुनी निलेशचंद्र विजय म्हणाले, 'जैन समाज शांतताप्रिय समाज आहे. शस्त्र उचलणं आमचं काम नाही. परंतु जे लोक शस्त्र उचलत आहेत, ते आमचे नाहीत. मात्र गरज पडल्यास आम्ही धर्मासाठी शस्त्र देखील उचलू. आम्ही भारताच्या संविधानाला मानतो. कोर्टाला मानतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मानतो. पण आमच्या धर्माच्या विरोधात आल्यास तर आम्ही कोर्टालाही मानत नाही'.

 Dadar Kabutar khana
Bank Rules : बँक खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये? काय आहे नवा नियम? VIDEO

मराठी एकीकरण समिती विचारणार सरकारला जाब

दादर कबूतरखाना प्रकरणावरून स्थानिक मराठी नागरिकांनी सरकार आणि पोलिस प्रशासनाला थेट सवाल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी १३ ऑगस्ट रोजी घटनास्थळी दाखल होऊन निवेदन सादर करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. 'पोलिसांना धक्काबुक्की करणारे, चाकू-सुरी आणणारे, कोर्टाचा अवमान करणारे अजूनही मोकाट का फिरत आहेत?" असा जाब स्थानिकांकडून विचारण्यात येणार आहे. स्थानिकांच्या या मागणीला मराठी एकीकरण समितीने देखील पाठिंबा दिला आहे. येत्या 13 तारखेला मराठी एकीकरण समितीचे शेकडो कार्यकर्ते देखील सरकारला जाब विचारणार आहेत.

 Dadar Kabutar khana
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट

स्थानिकांनी आरोप केला की, कायदा मोडणाऱ्यांना सहन करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. अशा व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास पुढील काळात नागरिक स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांचा ठाम इशारा आहे की, 'दादर कबूतरखाना कायम बंद राहिलाच पाहिजे, अन्यथा लाखोंचा मोर्चा निघेल, असा इशारा मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांच्याकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com