
मुंबईत राहणाऱ्या ८० वर्षांच्या वृद्धाची सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. ४ महिलांनी सोशल मीडियावरून मैत्री करत वृद्धाला 8.7 कोटी रुपयांचा गंडा घातला. मागील दोन वर्षांपासून वृद्धाची फसवणूक सुरु आहे. कोट्यवधी रुपये गमावल्यानंतर वृद्धाने पोलिसांत धाव घेतली.
वृद्धाला सोशल मीडियावरील अकाउंटवरून शार्वी नावाच्या तरुणीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. सुरुवातीला वृद्धाने रिक्वेस्ट नाकारली. काही दिवसांनी पुन्हा एकदा रिक्वेस्ट पाठवली. दोघांमध्ये हळूहळू बोलणं सुरु झालं. काही वेळाने व्हॉट्सअॅप चॅटवर बोलणं सुरु झालं.
शार्वीने घटस्फोटीत आणि दोन मुलांची आई असल्याचे सांगितलं. घटस्फोट झाल्यानंतर अनेक समस्यांशी सामना करावा लागत असल्याचे महिलेने वृद्धाला सांगितले. शार्वीने हळूहळू वृद्धाकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मुलांच्या आजाराचं कारण सांगितलं. शार्वीने वेगवेगळं कारण सांगून वृद्धाची फसवणूक सुरुच ठेवली.
काही दिवसांनी कविता नावाच्या महिलेशी वृद्धाची ओळख झाली. या कविताने अश्लील मेसेज पाठवले. सोशल मीडियातून बोलणं वाढल्यानंतर मुलांचं आजारपण आणि शिक्षणाचं कारण सांगून पैशांची लूट सुरु ठेवली. काही दिवसांनी दीनाज नावाच्या महिलेने शार्वीची बहीण असल्याचे सांगितले. शार्वीचा मृत्यू झाला असून तिचं रुग्णालयातील बिल भरायचं आहे, असं सांगून दीनाजेने वृद्धाला पैसे मागितले.
दीनाजने वृद्धाचा विश्वास जिंकून हजारो रुपये घेतले. वृद्धाने दिलेले पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यावेळी दीनाजने पैसे देण्यास नकार देत आत्महत्येची धमकी दिली. त्यानंतर वृद्धाची मैत्री जास्मीन नावाच्या महिलेशी झाली. तिने दीनाजची मैत्रीण असल्याचे सांगितले. जास्मिनने देखील मदत मागितली. तिलाही वृद्धाने पैसे दिले.
८० वर्षांचा वृद्ध एकापाठोपाठ महिलांच्या जाळ्यात अडकत गेला. त्याने एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२५ दरम्यान ८.७ कोटी रुपये महिलांना ट्रान्सफर केले. कोट्यवधी रुपये गमावल्यानंतर वृद्धाने सूनेकडून २ लाख रुपये उसणे मागितले. तर मुलाकडून ५ लाख रुपये उसणे मागितले. मुलाला संशय आल्याने वडिलांना विश्वासात घेत माहिती जाणून घेतली. पुढे वृद्धाने २२ जुलै रोजी सायबर क्राइम हेल्पलाइनची मदत घेतली. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी एफआयआर नोंद केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.