
सुशील थोरात, साम टीव्ही
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेणाऱ्या ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या गंभीर प्रकरणाची तक्रार दडपण्यासाठी धमकी दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी शिक्षक अद्याप फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या सात वर्षांची मुलगी गेल्या महिनाभरापासून शाळेच्या सुट्टीत एकटी असल्याचा फायदा घेत शिक्षकाने तिच्यावर वेळोवेळी अश्लील वर्तन करत गंभीर स्वरूपाचे लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलगी आरडाओरडा करू लागल्यावर शिक्षकाने तिच्यावर मारहाणही केल्याचे समोर आलंय.
पीडित मुलीच्या पालकांनी गावातील आदिनाथ रामनाथ दराडे,राजेंद्र सूर्यभान दराडे, मुनवरखान सर्वरखान पठाण, उमर नियाज पठाण यांना ही बाब सांगितली. त्यानंतर त्यांनी तक्रार न करण्यासाठी दबाव आणला. तक्रार केल्यास गावात राहू देणार नसल्याची धमकी दिली. त्यांनी पीडितेच्या कुटुंबाला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकरण बाहेर आल्यानंतर पाथर्डी पोलिसांनी चौघांना अटक केली
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक विलास जाधव तसेच पोहेकॉ. संदीप ठाकणे, नितीन दराडे, बाबासाहेब बडे, इजाज सय्यद, अक्षय वडते आणि अमोल जवरे यांच्या पथकाने चौघांवर कारवाई केली. या घटनेचा पर्दाफाश करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड आणि अॅड. हरिहर गर्जे पुढे आले. या सामाजिक कार्यकर्त्यांना हेरंब कुलकर्णी, स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी यांची मदत मिळाली. तसेच उडान संस्थेच्या पूजा दहातोंडे व शाहीन शेख यांनीही मदत केली.
पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी पाथर्डीमधील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. रुग्णालयातून वैद्यकीय अहवाल प्राप्त होणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शिक्षक सध्या फरार आहे. त्याच्या अटकेसाठी पथक शोधकार्य करत आहे. या प्रकरणात शिक्षकाला फाशीची शिक्षा व्हावी आणि खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.