
कसोटीदरम्यान टीम इंडियाला मोठा झटका
टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ आणखी एका टेस्ट सीरीजमधून बाहेर जाणार
ऋषभ पंतच्या गैरहजेरीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढणार
इंग्लंडविरोधात चौथ्या टेस्टच्या पहिल्याच दिवशी विकेटकीपर ऋषभ पंत दुखापतग्रस्त झाला. जलद गोलंदाज क्रिस वोक्सचा एक चेंडू त्याच्या बुटाला लागला. त्यानंतर त्याच्या पायाचा अंगठा फ्रॅक्चर झाला. यामुळे ऋषभ ६ आठवड्यासाठी टीम इंडियातून बाहेर पडला. ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आशिया कपमधूनही ऋषभ पंत बाहेर होणार आहे. त्यानंतर आता आणखी टेस्ट सीरीजमधून बाहेर होऊ शकतो.
दुबईत ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आशिया कप स्पर्धेची सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंत दुखापतीमुळे इंग्लडविरोधातील मालिकेतून बाहेर पडावं लागलं. आता पंत वेस्ट इंडिजविरोधात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टेस्ट सीरीजमधूनही बाहेर होऊ शकतो. टीम इंडियाच्या वेस्ट इंडिजविरोधात दोन कसोटी सामने होणार आहेत. या सीरीजमध्ये पंत खेळण्याची शक्यता कमी आहे.
पंतच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की, 'पंतचा जो अंगठा फ्रॅक्चर झाला आहे, तो बरा होण्यासाठी ६ आठवडे लागतील. त्याची सर्जरी होणार नाही'. मॅनचेस्टरमध्ये दुखापतग्रस्त झाल्यानंतरही पंत फलंदाजीसाठी उतरला होता.
मॅनचेस्टर टेस्टच्या पहिल्याच सामन्यात पंतला दुखापत झाली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पंतचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले. त्यानंतरही सामनाच्या दुसऱ्या दिवशी शार्दुल ठाकूर बाद झाल्यानंतर पंत मैदानात उतरला होता.
मैदनात उतरल्यानंतर पंतने अर्धशतक ठोकलं होतं. पंतने इंग्लंडच्या विरोधात ५ कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केली. त्याने ४ टेस्ट सामन्यात ७ डावात ६८.४२ च्या सरासरीने ४७९ धावा केल्या होत्या. पंतने २ शतक आणि ३ अर्धशतक ठोकले होते. पंतने इंग्लंडविरोधात ५ कसोटी सामन्यात केलेल्या कामगिरीची जोरदार चर्चा झाली. त्याने कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहाव्या स्थान पटकावलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.