Siya Goyal Lohagad Fort News  Saam
मुंबई/पुणे

Ketan Agarwal: सियाच्या भयंकर कृत्यानं वडिलांना मानसिक धक्का, ICU मध्ये उपचार; आई म्हणाली, तिलाही लोहगडावरुन ढकलून द्या

Siya Goyal father admitted to ICU after Ketan Agrawal murder case : लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या वडिलांची प्रकृती बिघडून त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. तर सियाच्या आईने मुलगी दोषी ठरल्यास कठोर शिक्षा व्हावी अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.

Namdeo Kumbhar

Siya Goyal Lohagad Fort News : पुण्यातील लोहगडावरील केतन अग्रवाल हत्याकांडातील मुख्य आरोपी सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण गोयल यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. केतन हत्याकांडाच्या सुरू असलेल्या तपासाच्या प्रचंड तणावामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे.

प्रवीण गोयल यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि आयसीयूच्या सभोवतालचा परिसर सुरक्षित करण्यासाठी रुग्णालयाच्या आवारात कडक निगराणी ठेवण्यात आली आहे. प्रशासनाने कुटुंबावर बारकाईने लक्ष ठेवले असून, डॉक्टर आरोपीच्या वडिलांच्या प्रकृतीतील सुधारणेवर सतत लक्ष ठेवून आहेत. १८ जून रोजी केतन अग्रवालची हत्या झाली. सुरुवातीला हा एक अपघात असल्याचे म्हटले गेले. नंतर, तपासात हा अपघात नसून खून असल्याचे उघड झाले. पोलिसांनी या प्रकरणी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना अटक केली आहे.

सिया गोयलनं होणाऱ्या नवऱ्याला बॉयफ्रेंडच्या मदतीने मारल्याचं समजताच वडिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ICU उपचार घेत आहेत. सियाच्या आई-वडिलांनी रुग्णालयातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी या दोघांनाही सिया दोषी असेल तर तिला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे स्पष्टपणे सांगितले. सियाची आई म्हणाली की, केतनच्या हत्या प्रकरणात सिया दोषी आढळली, तर तिलाही त्याच किल्ल्यावरून खाली ढकलून द्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया सियाचे वडील आणि आई यांनी दिली. आरोपी सियाचे वडील प्रवीण गोयल म्हणाले की, माझी मुलगी असे कृत्य करू शकते यावर विश्वास बसत नाही.

मीडियाशी बोलताना सियाची आई म्हणाली की, ते एकमेकांशी व्हिडिओ कॉलवर बोलायचे. ते आनंदी होते. केतन जेवणासाठी आमच्या घरीही आला होता. काहीतरी अयोग्य घडत असल्याचे कोणतेही संकेत आम्हाला कधीच दिसले नाहीत. जर सियाने केतनसोबत लग्न करायचे नाही, असे सांगितले असते तर लग्नाच्या खरेदीवर इतका खर्च का केला असता? आम्ही मोठ्या उत्साहाने लग्नाची तयारी करत होतो. पण सगळ उद्ध्वस्त झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव जिल्ह्यात सर्वात मोठी जुगारविरोधी कारवाई

3 वर्षांच्या मुलात एवढी क्रुरता कुठून आली? प्री-स्कूलमध्ये लहानग्याला बेदम मारहाण

Nasrapur case : नसरापूर अत्याचारात नराधम दोषी, 29 जूनला भीमराव कांबळेला फाशी? कोर्टात नेमकं काय घडलं?

पावसाळ्यात लिपस्टिक लावावी की नाही? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Fact Check: राम मंदिरातील चोरीचं CCTV फुटेज? दान मोजतानाच नोटांचे बंडल टाकले खिशात?

SCROLL FOR NEXT