Maharashtra politic : ६ खासदार फुटल्यानंतर ठाकरेंना आणखी धक्का, अंबादास दानवे महायुतीच्या गोटात, राजकारणात खळबळ

Ambadas Danve, Uddhav Thackeray news : उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीऐवजी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे.
Ambadas Danve
Ambadas Danve साम टीव्ही मराठी
Published On

Ambadas Danve joins Mahayuti panel : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ खासदार फुटल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच अंबादास दानवे यांच्या भूमिकेने पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. कारण, ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते आणि आमदार अंबादास दानवे थेट महायुतीच्या गोटात दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्या (MVA) पॅनलऐवजी भाजप आणि महायुतीच्या पॅनलमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मविआचे पॅनल सोडून महायुतीसोबत; नव्या समीकरणांची नांदी?

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकूण १२ जागांसाठी थेट लढत होत आहे. यात८ संचालक आधीच बिनविरोध झाले आहेत. याच निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत रंगली आहे. मविआचे स्वतःचे पॅनल मैदानात असतानाही, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख नेते अंबादास दानवे यांनी मविआला डावलून महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात नवीन समीकरणं पाहायला मिळणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Ambadas Danve
भर उन्हात गरम कपडे, लपून-छपून डोळ्यांनी इशारे; केतन अग्रवालच्या हत्येपूर्वी आरोपीने काय काय केलं? धक्कादायक माहिती आली समोर

'कप-बशी' चिन्हावर निवडणूक लढवणार!

अंबादास दानवे हे जिल्हा बँक निवडणुकीत 'बिगर शेती संस्था' मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. याच मतदारसंघातून महायुतीचे मोठे नेते आणि मंत्री अतुल सावे, रामराव शेळके, अर्जुन पाटील आणि रवींद्र काळे हेदेखील निवडणूक लढवत आहेत. दानवे आता या नेत्यांसोबत एकाच पॅनलमध्ये असून त्यांना 'कप-बशी' हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यांची थेट लढत मविआच्या जगन्नाथ काळे, बाबूराव पवार, देवयानी डोणगावकर, प्रणिकेत पाटील आणि दादाराव वानखेडे यांच्यासोबत होणार आहे.

Ambadas Danve
Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

अंबादास दानवेंचे स्पष्टीकरण, काय म्हणाले?

या संपूर्ण प्रकरणावर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी स्वतः समोर येत स्पष्टीकरण दिले आहे. दानवे म्हणाले की, "बँकेच्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचे पक्षीय राजकारण नसते. या निवडणुकीचा आणि महायुतीचा किंवा राज्याच्या पक्षीय राजकारणाचा कोणताही संबंध नाही." हा निर्णय स्थानिक पातळीवरील आणि सहकार क्षेत्रापुरता मर्यादित असल्याचा दावा दानवेंनी केला असला, तरी ऐन पडझडीच्या काळात त्यांनी भाजप-महायुतीशी हातमिळवणी केल्यामुळे ठाकरेंच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली आहे.

Ambadas Danve
Maharashtra Weather Update: अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय; पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार, IMD कडून अलर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com