Ketan Agarwal Killed Case Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया-चेतनसह आणखी एकाचा सहभाग? पोलिसांची संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

Pune Crime: पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात सिया आणि चेतन व्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

Priya More
  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी अटकेत

  • हत्या कटात तिसऱ्या व्यक्तीच्या सहभागाचा संशय

  • पोलिसांनी सियाच्या घरी जाऊन पंचनामा केला

  • पुरावे नष्ट झाले का याचा तपास सुरू

दिलीप कांबळे, मावळ

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे पोलिसांकडून त्याची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला बेड्या ठोकण्यात आल्यात. मात्र सिया आणि चेतनच्या कटात आणखी कोणाचा तरी सहभाग आहे? असा संशय लोणावळा पोलिसांना आहे. उरलेल्या दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत सिया आणि चेतनकडे या अँगलने तपास केला जाणार आहे. त्यामुळे पोलिसांची संशयाची सुई नेमकी कुणाकडे आहे? आणि ती व्यक्ती नेमकी कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय.

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी आतापर्यंत अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले. यात सियाचा भाऊ साहिल, वडील प्रवीण आणि आई पूजा अशा संपूर्ण गोयल कुटुंबियांची कसून चौकशी झाली. सिया आणि केतनच्या लग्न ठरविण्यात मध्यस्थी असणारे मित्तल दाम्पत्याचे दोन दिवस जबाब नोंदवण्यात आलेत. बालीला प्री-विडिंग शूटसाठी जाताना मुंबई विमानतळापर्यंत सोडणाऱ्या कॅब ड्रायव्हरकडून ही घटनाक्रम जाणून घेण्यात आलाय. पण सिया आणि चेतनच्या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का? हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही.

मात्र रिमांड मिळवताना सिया आणि चेतनच्या कटात कोणाचा सहभाग आहे का? तशी चौकशी या दोघांकडे करायचं असल्याचं वडगाव न्यायालयात म्हटलं आहे. त्यामुळं लोणावळा पोलिसांची संशयाची सुई नेमकी कोणाकडे आहे? हा प्रश्न अजून ही अनुत्तरित आहे. अशातच या हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान पुणे ग्रामीण पोलिस सिया गोयलला घेऊन तिच्या घरी आले होते.

मोठ्या पोलिस बंदोबस्तात सियाला तिच्या पुण्यातील घरी आणण्यात आले होते. या घटनेनंतर आरोपीच्या उपस्थितीत पंचनामा करण्यासाठी पुणे ग्रामीण सियाच्या घरी आले असल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर सियाचे कपडे, मोबाईल, इतर गोष्टींचा पंचनामा करण्यासाठी पोलिस सियाच्या घरी गेले होते. १८ जून रोजी घटना घडल्यावर सियाने कुठले पुरावे नष्ट केले का? याचा तपास करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

SCROLL FOR NEXT