जरांगे सुपारी घेऊन काम करतात; मंत्र्याचा खळबळजनक आरोप, शिंदेसेनेचे नेतेच शिंदेंना खाली नेणार, जरांगेंचा पलटवार

Manoj Jarange Questions Ramdas Kadam: ऑडिओ बॉम्बची एसआयटी चौकशी सुरू झालीय. त्यामुळे जरांगे विरूद्ध रामदास कदम असा वाद पेटलाय. हा ऑडिओ बॉम्ब कुणाला भोवणार? कुणामागे आता एसआयटी चौकशीचा फेरा लागणार? पाहूयात हा रिपोर्ट
500 CRORE AUDIO BOMB
500 CRORE AUDIO BOMBsaam tv
Published On: 

500 कोटींच्या आरोपांवरून शिंदेसेना आणि मनोज जरांगे आमनेसामने आलेत. जरांगे यांच्याकडून एसआयटीनं 500 कोटींच्या संवादाबाबतची ऑडिओ क्लिप ताब्यात घेतल्यानंतर आता हा वाद आणखीनच वाढलाय. जरांगे आणि रामदास कदमांच्या वादात त्यांचा मुलगा गृहराज्यमंत्री योगेश कदमही यांनीही उडी घेलीय. जरांगे सुपारी घेऊन काम करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. तर शिंदेसेनेतल्या नेत्यांमुळे एकनाथ शिंदे बदनाम होत असल्याचा पलटवार जरांगेंनी केलाय.

मुळात शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या मागणीनंतर मनोज जरांगेंची सुमारे 2 तास एसआयटीकडून चौकशी करण्यात आलीये. चौकशीत आपल्याकडील रेकॉर्डिंग असलेला पेनड्राईव्ह SITनं ताब्यात घेतल्याचं जरांगे म्हणालेत. इतकंच नव्हे तर, माझ्या आधी ही क्लिप रामदास कदमांकडे होती, त्यामुळे त्यांचीही चौकशी करण्याची मागणी जरांगेंनी केलीय. मात्र रामदास कदमांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

या ऑडिओ बॉम्बची एसआयटी चौकशी सुरू झालीय खरी. मात्र यावरून पुन्हा एकदा जरांगे विरुद्ध शिंदेसेना संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. मात्र,जरांगेंनी रामदास कदमांचं थेट नाव घेतल्यानं त्यांचीही एसआयटी चौकशी होणार का?... याकडे लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.