AI मुळे गेल्या काही महिन्यांपासून आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा सपाटा लावलाय. त्यातच आता येत्या 5 वर्षांत जगभरातून सुमारे कोट्यवधी लोकांच्या रोजगारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भविष्यात अनेक कंपन्या AI चा वापर वाढवतील आणि त्याचा परिणाम थेट नोकर कपातीवर होईल असा दावा जेपी मॉर्गननं केलाय. जेपी मॉर्गनच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात...
Al मुळे कोट्यवधी बेरोजगार? - HDR
येत्या 5 वर्षात सरासरी तब्बल 2 कोटी 40 लाख नोकऱ्यांवर परिणाम होईल
AI मुळे होणारा बहुतांश बदल लोकांना नोकरीवरून काढण्याऐवजी रिक्त पदे न भरण्याच्या स्वरूपात दिसू शकतो
नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याऐवजी कंपन्या AI वरील खर्च वाढवू शकतात
नोकऱ्या पूर्णपणे संपण्यापेक्षा कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता अधिक आहे
विविध क्षेत्रांमध्ये AI वापराचा वेग वेगवेगळा असू शकतो
अचानक मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जाण्याचा धोका कमी असू शकतो
विशेष म्हणजे, भविष्यात कामाचा वेग आणि उत्पादकता वाढवण्यासाठी AI चा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागणार आहे. आधीच जगभरातील टेक कंपन्यांकडून वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी AIला प्राधान्य दिलं जातंय.. त्यामुळे एकूणच AI मुळे अनेकांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.