BJPचे सर्व आमदार 25 दिवस गावोगाव फिरणार; 71,000 मतदान केंद्रांना भेटी, भाजपचं काय आहे नवं अभियान?

BJP Launches Campaign : भाजप आपल्या देशव्यापी मोहिमेची तयारी अधिक तीव्र करत आहे. पक्षाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते २५ दिवस गावागावांत जाऊन भेटीगाठी का घेणार आहेत आणि त्यासाठी कार्यशाळांचे आयोजन कसे केले जात आहे, हे जाणून घ्या.
Bjp New Campaign: Mlas To Visit 71,000 Polling Booths In 25 Days
Bjp New Campaign: Mlas To Visit 71,000 Polling Booths In 25 Days
Published On: 
Summary
  • भाजपचे आमदार २५ दिवस गावोगावी जाऊन मुक्काम करणार

  • भाजपच्या नव्या अभियानात ७१ हजार मतदान केंद्रांना भेटी

  • तळागाळातील संघटना मजबूत करण्यासाठी भाजपची नवी मोहीम

भाजप आता तळागाळातील आपली संघटना अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी, पक्ष महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात एक मोठी मोहीम सुरू करणार आहे. पक्षाचे आमदार आणि वरिष्ठ नेते आपापल्या मतदारसंघांतून बाहेर पडून इतर भागांत २५ दिवसांसाठी मुक्काम करणार आहे. भाजपने मोहिमेच्या सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर आपली तयारी अधिक तीव्र केलीय. पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची माहिती देण्यासाठी आणि मोहिमेची रूपरेषा स्पष्ट करण्यासाठी राज्यातील तीन विभागांमध्ये कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. ठिक ठिकाणी कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.

Bjp New Campaign: Mlas To Visit 71,000 Polling Booths In 25 Days
विधानसभा निवडणुकीपूर्वी उच्च न्यायालयाचा भाजपला दणका; नेत्याची थेट आमदारकी रद्द, काय आहे प्रकरण?

या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मराठवाडा विभागीय कार्यशाळेला भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. या कार्यशाळेत अभियानाचे सूक्ष्म नियोजन, कार्यपद्धती आणि प्रभावी अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी आवाहन केलं की, “समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेणे, त्यांना आवश्यक ते सहकार्य करणे आणि सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे, हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी परस्पर समन्वयाने काम करावे.”

Bjp New Campaign: Mlas To Visit 71,000 Polling Booths In 25 Days
विधानसभा निवडणुकीपूर्वी उच्च न्यायालयाचा भाजपला दणका; नेत्याची थेट आमदारकी रद्द, काय आहे प्रकरण?

या मोहिमेचा उद्देश काय आहे?

यासह 'सेवा दूत' मोहिमेदरम्यान गोळा केलेली माहिती आणि स्थानिक रहिवाशांकडून मिळालेला अभिप्राय यांचा समावेश असलेला अहवाल थेट संघटनेकडे सादर करणे आवश्यक आहे. या आधारे, पक्ष कमकुवत मतदान केंद्रे आणि संघटनात्मक त्रुटींची ओळख पटेल, तसेच त्यांना बळकट करण्यासाठी एक धोरण आखले जाणार आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष हेमंत खंडेलवाल यांनी सांगितले की, या मोहिमेचा उद्देश केवळ सेवा कार्ये करणे हा नसून, त्यासोबतच सेवा, जनसंपर्क आणि संघटनात्मक विस्तार यांनाही पुढे नेणे हा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.