Police investigation intensifies in Ketan Agarwal murder case as cricket connection between accused comes to light. saam tv
मुंबई/पुणे

केतन अगरवाल हत्या प्रकरणात थेट क्रिकेट कनेक्शन समोर; पोलिसांनी दिली महत्वाची माहिती

Ketan Agarwal Killed Case Cricket Connection Details: पुण्यातील केतन अगरवाल हत्या प्रकरणात क्रिकेट कनेक्शन समोर आले आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यातील संबंध, कॉल रेकॉर्ड आणि पोलिस तपासातील महत्त्वाचे खुलासे जाणून घ्या.

Omkar Sonawane

पुण्यातील केतन अगरवाल हत्येप्रकरणी रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहे. या प्रकरणी सिया आणि चेतन चौधरी यांना अटक केली आहे. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून त्यातून आता गंभीर बाब समोर येत आहे. सिया आणि चेतन यांची ओळख क्रिकेटच्या माध्यमातून झाली असून सियाचा भाऊ साहिलमुळे हे दोघे संपर्कात आले असल्याचे वृत्त इंडिया टूडेने दिले आहे.

क्रिकेटपटू असलेल्या चेतनने साहिलबरोबर काही सामने खेळले होते आणि सामन्यांच्या वेळी सिया अनेकवेळा तिच्या भावासोबत सामने पाहायला जात असे. याच ठिकाणी सिया आणि चेतनची पहिली ओळख झाली आणि त्यानंतर ते पुन्हा एकमेकांना भेटले, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी सांगितले की, 2025 मध्ये एका मित्राने आयोजित केलेल्या दिवाळीच्या कार्यक्रमात सिया आणि चेतनची पुन्हा भेट झाली. या भेटीनंतर त्यांच्यातील संवाद वाढत गेला. तपास अधिकाऱ्यांनी कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासले असता हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून नियमित संपर्कात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांची दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यांपासून सिया गोयल आणि चेतन यांच्यात तब्बल 2004 वेळा फोनवर बोलणे झाले. या संभाषणाचा कालावधी जवळपास 238 तास इतका होता. यामुळे दोन्ही आरोपीमध्ये सातत्याने संवाद सुरू असल्याचे दिसून येते.

दरम्यान सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी तिच्या चेतनसोबतच्या नात्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचा दावा केला आहे. आम्हाला सियाच्या प्रेमसंबंधाबाबत काहीच माहिती नव्हती. सिया साधी मुलगी आहे. ती फक्त १९ वर्षांची आहे. चेतन कोण आहे, कुठून आला, याबद्दल मला काहीच माहिती नाही. मी त्याला कधी पाहिलंही नाही किंवा बोललोही नाही. तो आमच्या घरी कधीच आला नाही, असे त्यांनी सांगितले.

तपासाचा भाग म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी सियाचा भाऊ साहिल गोयल याचा जबाब नोंदवला. प्राथमिक तपासात साहिलला सियाच्या चेतनसोबतच्या नात्याची माहिती होती, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याने ही माहिती इतर कुटुंबीयांना दिली होती का, याची पडताळणी केली जात आहे. दरम्यान, सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना २९ जूनपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT