केतन अगरवाल हत्या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आलीये. आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल याला सिया आणि चेतन यांच्यातील प्रेमसंबंधांची संपूर्ण कल्पना आधीपासूनच होती, असं पोलीस तपासातून उघड झालंय. त्यामुळे या प्रकरणाची गोयल कुटुंबाला कोणतीही माहिती नव्हती हा सुरुवातीचा संशय आता खोटा ठरलाय. इतकंच नव्हे तर आरोपी सियानं केतनशी लग्न न करण्यासाठी दिलेली कारणं अतिशय धक्कादायक आहेत. पोलीस चौकशीत सियानं नेमकी काय माहिती दिलीये पाहूयात....
केतनला टक्कल, सियाचा दावा
केतनला टक्कल असल्यानं आणि तो विग घालत असल्यानं लग्न करायचं नव्हतं
विग घालत होता म्हणून लग्न करण्याची इच्छा उरली नव्हती
केतनचा कड्यावर बसलेला फोटो पाहून सियाला दरीत ढकलण्याची कल्पना सुचली
दरीत ढकलण्याचा कट फसला असता तर अपघातात ठार मारण्याचा दुसरा प्लॅन तयार होता
अटक झाल्यानंतर आरोपी सिया आणि साथीदार चेतनचे एकमेकांवर आरोप
तर दुसरीकडे, केतनला टक्कल असल्याचं सियासह तिच्या कुटुंबाला लग्न ठरण्याआधीच सांगितल्याचं केतनच्या वडिलांचं म्हणणंय. तर दुसरीकडे केतनच्या हत्येच्या आरोपाखाली अटकेत असणाऱ्या सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यात पोलीस कोठडीत जोरदार ब्लेम गेम सुरू झालाय. शिक्षेपासून वाचण्यासाठी दोघांनी आता एकमेकांवरच हत्येचा कट रचल्याचा आरोप केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. चेतनच्या म्हणण्यानुसार, त्याला सियासोबत पळून जायचं होतं. मात्र, केतनची हत्या करण्याचा आग्रह सियानेच धरल्याचं चेतनचं म्हणणंय. तर दुसरीकडे, हत्येचा कट चेतनंच रचल्याचा दावा सियानं केल्याचा माहिती सूत्रांनी दिलीय.
केतनच्या हत्या प्रकरणात सिया दोषी असल्यास तिलाही लोहगडावरून ढकलून द्या, अशी उद्विग्न प्रतिक्रिया सियाच्या आईनं दिलीय. तर सियानं हत्या केल्याचं कळताच तिच्या वडिलांनाही मोठा धक्का बसलाय. सियाच्या व्हॉट्सअप चॅट्सची तपासणी केल्यानंतर तिनं पोलिसांना सांगितलेली कहाणी खोटी असल्याचं स्पष्ट झालंय. तर दुसरीकडे, केतनच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीये. हे प्रकरण आता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवण्यात आलं असून जलदगती न्यायालयात खटला चालवला जाणार आहे. त्यामुळे आता या खटल्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.