

बिहारच्या गोपालगंजमधील कार पार्किंगचा अनोखा प्रकार सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
तीन मजली घराच्या गच्चीवर चक्क कार पार्क केलेली दिसत असल्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.
पार्किंगसाठी घराची गच्ची निवडल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
आता बातमी आहे, कारच्या भन्नाट पार्किंगची.एका पठ्ठयानं गाडी पार्किंगसाठी थेट घराची गच्ची सिलेक्ट केलीय..मात्र घराच्या गच्चीवर कार कशी आणि कशासाठी नेऊन ठेवली? पाहा या हटके रिपोर्टमधून. गड्याकडं एक गाडी अन् पार्किंग करायला तीन ताळाची माडी. आता ही व्हिडीओच बघा की. बिहारच्या गोपालगंजचा. एक वाघ घराच्या गच्चीवर गाडी पार्क करायला लागलाय.. ती बी क्रेनच्या मदतीनं हाय का नाय कुटाना.
ज्या माणसाची गाडी त्याचं नाव मनोज. मनोज इस्रायलला कामाला. गडी इस्रायला केल्यावर गाडी कोण चालवणार ही प्रश्न वाघाला पडला. मग पट्ट्यानं गाडी शेफ पार्किंगसाठी घराची गच्ची निवडली अन् क्रेन बोलवली. क्रेन बी आली..गाडीला बांधलं अन् गाडीचं झालं टेक ऑफ अन् थेट लॅंडिग गच्चीवर. या करामती माणसाचा व्हिडीओ उद्योग पती आनंद महिंद्रानं सोशल मीडियावर पोस्ट केलाय.
पेशल अन् महत्त्वाचं सांगयचं तर तुम्ही ही बघून घर बसल्या उद्योग करु नका.गाडीचं असतंय वजन .घराच्या स्लॅबला सोसलं नाय तर व्हायचं लाखाचं 12 हजार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.