महाराष्ट्रात खळबळ! TET पेपरफुटीचे ठाणे कनेक्शन उघड, असं फुटलं बिंग, धक्कादायक माहिती उघड

MAHA TET 2026, TET paper leak : भिवंडीतील पोलिसांच्या धाडीत टीईटी 2026 प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा संशय समोर आल्यानंतर महाराष्ट्रभर होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ठाणे कनेक्शन उघड झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
MAHA TET 2026 paper leak latest update
MAHA TET 2026 paper leak latest update
Published On

MAHA TET 2026 paper leak latest update : देशभरात 'नीट' परीक्षेतील गोंधळ सुरू असतानाच आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचे सत्र सुरू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. २८ जून (रविवार) रोजी संपूर्ण राज्यात होणारी 'शिक्षक पात्रता परीक्षा' (TET - 2026) ऐनवेळी स्थगित करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे पोलिसांनी पहाटे टाकलेल्या एका धाडीमुळे टीईटीच्या पेपरफुटीचे बिंग फुटले. त्यामुळे या पेपरफुटीचे थेट 'ठाणे कनेक्शन' समोर आले आहे.

गोपनीय माहिती मिळाली अन् मध्यरात्री बिंग फुटले!

शनिवारी (२७ जून) पहाटेच्या सुमारास भिवंडी पोलिसांना एका खास सूत्राकडून पेपरफुटीची गोपनीय माहिती मिळाली होती. भिवंडीतील एका विशिष्ट ठिकाणी काही संशयित व्यक्तींकडे रविवारी होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि त्यातील प्रश्न उपलब्ध आहेत, अशी ही माहिती होती. माहिती मिळताच पोलिसांनी जराही वेळ न घालवता त्या संशयित पत्त्यावर थेट छापा टाकला.

अन् अधिकारीही चक्रावले...

धाड टाकल्यानंतर पोलिसांनी तिथून काही अनधिकृत प्रश्नपत्रिका आणि संशयास्पद साहित्य हस्तगत केले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने 'महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या' अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. पोलिसांनी जप्त केलेले प्रश्न आणि रविवारी प्रत्यक्षात परीक्षेला येणारे मूळ प्रश्न यांची समोरासमोर पडताळणी करण्यात आली. या तपासणीत संशयितांकडे मिळालेले प्रश्न आणि मूळ पेपरमधील प्रश्न एकसारखे असल्याचे आढळून आले. प्रश्नपत्रिका १०० टक्के फुटल्याचे स्पष्ट होताच भिवंडी पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला.

MAHA TET 2026 paper leak latest update
BREAKING: 'नीट'नंतर आता 'टीईटी'चाही पेपर फुटला; ठाण्यात पेपर लीक, उद्याची परीक्षा रद्द

लाखो उमेदवारांना मोठा धक्का

नीट परीक्षेतील गैरप्रकार पाहता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यंदा सुरक्षेची कडक नियमावली तयार केली होती. मात्र, परीक्षेच्या अवघ्या २४ तास आधीच ठाणे जिल्ह्यातून पेपर लीक झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. परीक्षा पारदर्शक पद्धतीनेच व्हावी यासाठी परीक्षा परिषदेने रविवारी होणारी परीक्षा तातडीने पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो डी.टी.एड. आणि बी.एड. धारक उमेदवारांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

MAHA TET 2026 paper leak latest update
Worli Sea Link : मुंबईत खळबळ! ठाण्याच्या उद्योजकाची आत्महत्या, वरळी सी-लिंकवरून टाकली उडी

पुढील तारीख कधी?

टीईटी परीक्षेची नवीन तारीख आणि पुढील सर्व अपडेट्स महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mscepune.in) जाहीर केले जातील, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

MAHA TET 2026 paper leak latest update
Maharashtra politics : फडणवीसांसोबत विमानात काय बोलणं झालं? ठाकरेंनी एका वाक्यात दिले सूचक संकेत, म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com