

Indian Railways New Rule : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी ही सर्वात महत्वाची बातमी आहे. रोज लाखोंहून जास्त लोक रेल्वेने प्रवास करतात. पण आता विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर लगाम घालण्यासाठी भारतीय रेल्वेने कडक नियम लागू केला आहे. त्यामुळे आत्ताच हा नियम जाणून घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल अन्यथा तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.
देशभरातल्या लाखो प्रवाशांसाठी रेल्वे हे सर्वात महत्वाचं आणि परवडणारं वाहतूकीचं साधन मानलं जातं. पण याच्या तिकीटाची किंमत कमी असून सुद्धा काही प्रवासी विनातिकीट किंवा चुकीच्या तिकीटांवर प्रवास करतात. याच कारणामुळे रेल्वे प्रशासनाने दंडाची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन नियमांनुसार, जन विश्वास अधिनियम २०२६ अंतर्गत रेल्वे कायदा १९८९ मधील कमल १३७ मध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलांमुळे विनातिकीट प्रवास करणे, वापरलेले तिकीट पुन्हा वापरणे किंवा चुकीच्या तिकीटावर प्रवास करणे हा गुन्हा मानला जाणार आहे. अशा प्रकारे प्रवास करताना एखादा प्रवासी पकडला गेल्यास त्याच्याकडून पूर्ण प्रवासभाडे वसूल करण्यात येईल. त्यासोबत स्वतंत्र दंडही आकारला जाणार आहे.
याआधी विनातिकीट प्रवासासाठी किमान २५० रुपयांचा दंड आकारला जात होता. पण आता नव्या नियमानुसार हा दंड दुप्पट केला आहे. म्हणजेच तुम्हाला एकूण ५०० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. रेल्वेच्या माहितीनुसार हा नवा नियम २० जून २०२६ पासून लागू करण्यात आले आहेत.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं की, दंड भरला नाही किंवा नियमांचं उल्लंघन कोणी करत असेल तर त्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.