KDMC News Saam Tv
मुंबई/पुणे

KDMC News: पगारासाठी कल्याण-डोंबिवलीतील सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

KDMC Sanitation Workers Strike: कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना कामबंद आंदोलन सुरु केले आहे. पगार मिळत नसल्याने त्यांनी कामबंद आंदोलन केले आहे.

Siddhi Hande

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचारी आंदोलन करत आहेत. पगार वेळेवर न मिळाल्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो.

घनकचरा विभागातील तसेच केडीएमटीशी संबंधित सुमारे ४२५ कर्मचाऱ्यांनी सामूहिक सुट्टी घेत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. अनेक महिन्यांपासून पगार वेळेवर मिळत नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला. पगार वेळेवर मिळावी, अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उल्हास भोईर यांनी महापालिका प्रशासनाला इशारा दिला आहे. कामगारांना वेळेवर पगार न दिल्यास हे आंदोलन तात्पुरते न राहता कायमस्वरूपी सामूहिक सुट्टी आंदोलनात रूपांतरित होईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनीही या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सोडवावा, अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा मनसे कडून देण्यात आला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याण डोबिंवली महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिला जात नव्हता. यामुळे कर्मचारी त्रस्त होते. कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी मागणी केली तरीही याचा विचार केला नाही. त्यामुळे आता ४०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कमबंद आंदोलन केले आहे. यामुळे कामावर परिणाम होणार असल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT