Siddhi Hande
सरकारी कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आता सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ई केवायसी केल्यानंतरच तुमचा पगार जमा होणार आहे.
दुबार नोंदणीमुळे होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
आता राज्यातील १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच वेतन दिले जाणार आहे.
एप्रिल अखेरपर्यंत ही ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेत.
वेतन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.
ई केवायसीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हे काम लवकरात लवकर करण्याचे आवाहन केले आहे.