Location Tracking : फोन नंबर वापरून मोबाइल लोकेशन कसं शोधायचं? 'हा' आहे सुरक्षित मार्ग

Shreya Maskar

डिजिटल युग

आजकाल डिजिटल युगात अनेक कठीण असलेल्या गोष्टी सहज-सोप्या झाल्या आहेत. मात्र यात धोका देखील तेवढाच आहे. बरेच लोक फोन नंबर वापरून लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करतात.

Digital | pinterest

फोन नंबरद्वारे मोबाईल लोकेशन ओळखा

ऑनलाइन उपलब्ध असलेल्या अनेक पद्धती युजरर्सची दिशाभूल करतात. युजर्सचा परवानगीशिवाय त्यांचे लोकेशन शोधणे सोपे नाही. त्यामुळे योग्य पद्धत कोणती जाणून घेऊयात.

Identify Mobile Location via Phone Number | pinterest

कॉलर आयडी

Truecaller सारखे कॉलर आयडी ॲप्स तुम्हाला नंबरबद्दल काही मूलभूत माहिती देतात. यामध्ये कॉलरचे नाव, प्रदेश आणि टेलिकॉम ऑपरेटर यांसारख्या तपशिलांचा समावेश असतो. मात्र हे ॲप्स लाइव्ह लोकेशन सांगत नाही. लोक अनेकदा इंटरनेटवर नंबर शोधून लोकेशन मिळवण्याचा प्रयत्न करतात, मात्र प्रायव्हसी फीचर्समुळे हे शक्य नाही.

Caller ID | pinterest

यूजरची परवानगी

जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचे अचूक लोकेशन जाणून घ्यायचे असेल तर त्याची परवानगी घेणे हा सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे. व्हॉट्सॲप आणि गूगल मॅप्ससारखे ॲप्स लोकेशन शेअरिंगची सुविधा देतात. यामुळे वापरकर्त्यांना त्यांचे सध्याचे लोकेशन दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करता येते.

User Permission | pinterest

लाइव्ह लोकेशन

लाइव्ह लोकेशनमुळे तुम्हाला ठराविक कालावधीतील त्यांच्या हालचाली पाहता येतात. तर करंट लोकेशन एक-वेळची माहिती पुरवते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे थर्ड-पार्टी ॲप्स टाळले पाहिजेत, कारण ते अनेकदा डेटा चोरू शकतात आणि तुमच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करू शकतो.

Live Location | pinterest

टेलिकॉम पद्धत

फोन नंबरचे अचूक लोकेशन शोधण्यासाठी सर्वात विश्वसनीय पद्धत म्हणजे पोलीस आणि सरकारी एजन्सीद्वारे वापरली जाणारी पद्धत. या प्रक्रियेमध्ये टेलिकॉम कंपन्यांची मदत घेतली जाते आणि त्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची आवश्यकता असते.

Telecom Method | pinterest

नंबर ट्रॅकिंग

न्यायालयाकडून आदेश मिळाल्यानंतर, टेलिकॉम ऑपरेटर तो नंबर ट्रॅकिंगवर टाकतात आणि एजन्सींना त्याच्या ठिकाणाची माहिती देतात. ही पद्धत सामान्य लोकांसाठी उपलब्ध नाही, तसेच कोणीही ती स्वतःहून वापरू शकत नाही.

Number Tracking | pinterest

ईमेल

ईमेलद्वारे फोन ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड डिव्हाइसशी जोडलेले गूगल अकाउंट (जीमेल) वापरावे लागेल. डिव्हाइसवर गूगल फाइंड माय डिव्हाइस साइट उघडा आणि तुमचा ईमेल वापरून साइन इन करा. नकाशावर सध्याचे किंवा शेवटचे लोकेशन शोधण्यासाठी डिव्हाइस निवडा. तथापि, या पद्धतीसाठी फोन ऑनलाइन असणे आवश्यक आहे.

Email | pinterest

NEXT : हॅकर्सची बोलती बंद; WhatsApp ची Security आणखी होणार तगडी, नवीन येणारे फीचर कसं काम करेल?

WhatsApp's New Feature | pinterest
येथे क्लिक करा...